जकार्ता - भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांना इंडोनेशिया मास्टर्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या शशिर हिरेन रुहवास्तितोने श्रीकांतला तर, चीनच्या लु गुआंग जू कडून सौरभला मात खावी लागली.
हेही वाचा - ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'
एक तास रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या शशिर हिरेन रुहवास्तितोने श्रीकांतला १८-२१, २१-१२, २१-१४ असे नमवले. तर, लु गुआंग जूने सौरभला १७-२१, २१-१५, २१-१० असे पराभूत केले आहे. लु गुआंग जू आणि सौरभमधील सामना ५७ मिनिटे रंगला होता.
पुरुष एकेरीसोबतच मिश्र दुहेरीतही भारताच्या पदरी निराशा पडली. दक्षिण कोरियाच्या को सुंग ह्युन आणि आयओम ही वो यांनी भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांना २१-८, २१-१४ असे हरवले.