मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. नेहमी चाहत्यांच्या गराड्यात राहणारे खेळाडू़ यामुळे आपापल्या घरीच कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अनेक खेळाडू या काळात घर काम करताना दिसून आले. अशात, भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिकपदक विजेती सायना नेहवाल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अंगणामध्ये झाडू मारताना पाहायला मिळत आहे. काही खेळाडूंनी आपले व्हिडीओ स्वत:हून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. पण सायनाचा व्हिडिओ तिने नाही तर अन्य कोणीतरी पोस्ट केला आहे.
-
DOES ANYONE RECOGNISE THIS GIRL...???
— Subba Rao🇮🇳🇮🇳 (@yessirtns) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🙄🤔🙄🙄🙄#celebrity pic.twitter.com/0V0v4LcdiB
">DOES ANYONE RECOGNISE THIS GIRL...???
— Subba Rao🇮🇳🇮🇳 (@yessirtns) April 5, 2020
🙄🤔🙄🙄🙄#celebrity pic.twitter.com/0V0v4LcdiBDOES ANYONE RECOGNISE THIS GIRL...???
— Subba Rao🇮🇳🇮🇳 (@yessirtns) April 5, 2020
🙄🤔🙄🙄🙄#celebrity pic.twitter.com/0V0v4LcdiB
दरम्यान, सध्याच्या घडीला कोरोनामुळे भारतामध्ये सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जगभरातही एकही स्पर्धा नाही. त्यामुळे खेळाडू घरीच बसून आहेत. त्याचबरोबर खेळाडूंना सरावही करता येत नसल्याचे दिसत आहे. यामुळे खेळाडू स्वत:ला घर कामामध्ये गुंतवून ठेवत आहेत. याआधी शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो घरामध्ये कपडे आणि कमोड धुताना पाहायला मिळाला. यानंतर त्याने पत्नी आयेशासोबत जितेंद्रच्या 'ढल गई शाम', या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओही पोस्ट केला होता.
लढा कोरोनाशी : मोदींच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातून प्रतिसाद, खेळाडूंनी केली दिव्यांची आरास
हरभजन आणि तिची पत्नी गीता यांनी केले ५ हजार कुटुंबियांना अन्नदान