बासेल - भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने स्वीस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आज झालेल्या सामन्यात सिंधूने अमेरिकेच्या आर्यिरस वांग हिचा सहज पराभव करत अंतिम-८ मध्ये जागा मिळवली.
ऑलिम्पिक विजेती सिंधूने ३५ मिनिटात वांगचा धुव्वा उडवला. तिने वांगवर २१-१३, २१-१४ अशा फरकाने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ७व्या स्थानी असलेल्या सिंधूचा वांगविरोधातील हा पहिलाच सामना होता.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या थायलंडच्या ब्रुसानन ओंगबामरु गफान हिच्याशी होणार आहे. दरम्यान, सिंधूने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिगित हिचा ४२ मिनिटात २१-१६, २१-१९ ने पराभव केला होता.
हेही वाचा - Swiss Open : सायना, कश्यपचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात
हेही वाचा - जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अश्विनी-सात्त्विकसाईराजचा धमाका