ETV Bharat / sports

बॅडमिंटन : सौरभ वर्माने पटकावले हैदराबाद ओपनचे जेतेपद - २६ वर्षीय सौरभ

तीन गेमपर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात २६ वर्षीय सौरभने प्रतिस्पर्ध्यावर मात केली आहे.

बॅडमिंटन : सौरभ वर्माने पटकावले हैदराबाद ओपनचे जेतेपद
author img

By

Published : Aug 11, 2019, 6:08 PM IST

मुंबई - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने हैदराबाद ओपनचे जेतेपद पटकावले. आज (रविवारी) झालेल्या अंतिम सामन्यात सौरभने सिंगापुरच्या लोह कीन यियूला पछाडले.

तीन गेमपर्यंत गेलेल्या या अंतिम सामन्यात २६ वर्षीय सौरभने प्रतिस्पर्ध्यावर मात केली आहे. सौरभने कीन यियूला २१-१३, १४-२१, २१-१६ असे हरवले.यंदाच्या मे महिन्यात स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय खिताब जिंकणारा सौरभ पहिल्यांदा कीन यियूसमोर मैदानात उतरला होता.

शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात, सौरभने मलेशियाच्या सिकंदर जुल्करनैनला २३-२१, २१-१६ अशी मात दिली होती. हा सामना ४८ मिनिटांपर्यंत चालला होता. सौरभने मागच्या वर्षी डच आणि रशिया ओपन या स्पर्धा आपल्या नावावर केल्या होत्या.

भारताच्या महिला बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीला कोरियाच्या बाएक हा ना आणि जंग क्यूंग युन सोबत अंतिम सामन्यात झुंजावे लागणार आहे.

Intro:Body:

बॅडमिंटन : सौरभ वर्माने पटकावले हैदराबाद ओपनचे जेतेपद

मुंबई - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने हैदराबाद ओपनचे जेतेपद पटकावले. आज (रविवारी) झालेल्या अंतिम सामन्यात सौरभने सिंगापुरच्या लोह कीन यियूला पछाडले.

तीन गेमपर्यंत गेलेल्या या अंतिम सामन्यात २६ वर्षीय सौरभने प्रतिस्पर्ध्यावर मात केली आहे. सौरभने कीन यियूला  २१-१३, १४-२१, २१-१६ असे हरवले.यंदाच्या मे महिन्यात स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय खिताब जिंकणारा सौरभ पहिल्यांदा कीन यियूसमोर मैदानात उतरला होता.

शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात, सौरभने मलेशियाच्या सिकंदर जुल्करनैनला २३-२१, २१-१६ अशी मात दिली होती. हा सामना ४८ मिनिटांपर्यंत चालला होता. सौगभने मागच्या वर्षी डच आणि रशिया ओपन स्पर्धा आपल्या नावावर केली होती.

भारताच्या महिला बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीला कोरियाच्या बाएक हा ना आणि जंग क्यूंग युन सोबत अंतिम सामन्यात झुंजावे लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.