नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपल्या शिष्यांना या लॉकडाऊन दरम्यान सकारात्मक आणि तंदुरुस्त राहण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी गोपीचंद यांनी पंतप्रधान केअर फंडला १५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. या व्यतिरिक्त त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सरकारला प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
मी या क्षणी माझ्या कुटूंबासमवेत वेळ घालवत आहे. मी योग आणि ध्यान करत असून तंदुरुस्ती कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मी माझ्या खेळाडूंशी संवाद साधत आहे, असे गोपीचंद यांनी सांगितले.
ते म्हणाले, "जे लोक अस्वस्थ होत आहेत ते रोजचे मजूर आणि शेतकरी आहेत त्यांच्या हातात पैसे नाहीत. त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे."