नवी दिल्ली - फोर्ब्सच्या यादीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही सर्वाधिक कमाई करणारी एकमेव भारतीय अॅथलॅटिक खेळाडू ठरली आहे. फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीनुसार, सिंधूची वार्षिक कमाई ३९ करोड इतकी असून ती यादीत १३ व्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या या यादीत प्रथम क्रमांकावर अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही आहे. त्याची वार्षिक कमाई २०० करोडहून अधिक आहे. तर त्यानंतर जपानची टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिचा नंबर लागतो. त्याची वार्षिक कमाई २०० करोडच्या जवळपास आहे.
पी. व्ही. सिंधू फोर्ब्सच्या २०१९ च्या यादीनुसार, भारताची एकमेव अॅथलॅटिक आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिला अंजिक्यपदावर आपली मोहोर उठवता आली नाही. अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिने तिचा पराभव केला.