कॅनडा - भारताचा स्टार बॅडमिटनपटू पारुपल्ली कश्यप याला कॅनडा ओपन सुपर 100 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवमुळे कश्यप याचे विजेतेपदाचे स्पप्न भंगले. चीनच्या ली शी फेंग याने कश्यपचा पराभव केला.
कॅनडा ओपन सुपर 100 स्पर्धेचा अंतिम सामना भारताचा पारुपल्ली कश्यप आणि चीनचा ली शी फेंग यांच्यात झाला. एक तास 16 मिनिटे चाललेल्या या सामन्यात फेंगने कश्यपचा 20-22, 21-14, 21-17 अशा पराभव केला.
कश्यपने ट्विट करत सांगितले की, कॅनेडा ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगली लढत झाली. मी सर्वोकृष्ट खेळ केला असा माझा दावा नाही. मात्र मी माझ्याकडून सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न केला. अस त्यानं सांगितलं. तसेच त्याने चाहत्याचे आभारही मानले आहेत.