ETV Bharat / sports

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सुवर्णपदक जिंकून सिंधूने दिले आईला बर्थ डे गिफ्ट

author img

By

Published : Aug 25, 2019, 7:57 PM IST

भारताची स्टार बॅडमिंटन पी. व्ही. सिंधूने अखेर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने जपानची खेळाडू नाओमी ओकुहारा हिचा अवघ्या ३६ मिनिटामध्ये २१-७, २१-७ असा धुव्वा उडवला. आज सिंधूच्या आईचा वाढदिवस आहे आणि आजचे सुवर्णपदक आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचे सिंधूने सामन्यानंतर बोलताना म्हणाली.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सुवर्णपदक जिंकून सिंधूने दिले आईला बर्थ डे गिफ्ट

बासेल - भारताची स्टार बॅडमिंटन पी. व्ही. सिंधूने अखेर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने जपानची खेळाडू नाओमी ओकुहारा हिचा अवघ्या ३६ मिनिटामध्ये २१-७, २१-७ असा धुव्वा उडवला. आज सिंधूच्या आईचा वाढदिवस आहे आणि आजचे सुवर्णपदक आईला बर्थ डे गिफ्ट असल्याचे सिंधूने सामन्यानंतर बोलताना म्हणाली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ४-१ अशी लीड घेतली होती. त्यानंतरही हाच धडाका कायम ठेवत तिने पहिला गेम २१-७ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूचाच बोलबाला होता. तिने २-० पासून ५-२, ८-२ असे करत दुसरा गेमही २१-७ ने जिंकला. फुल्ल फार्मात असलेल्या सिंधूने हा सामना अवघ्या ३६ मिनीटात जिंकला.

सामन्यानंतर बोलताना सिंधू म्हणाली, 'मी क्षणाची खूपच आतुरतेने वाट पाहत होते. हा विजय माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. हे सुवर्णपदक माझ्याकडून आईला मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.'

सिंधू एकेरीमध्ये एक सुवर्ण, रौप्य जिंकणारी जगातील चौथी खेळाडू बनली आहे. ली लिंगवेई, गोंग रुईना आणि झांग निंग यानंतर सिंधूचा नंबर लागतो.

भारतीय बॅडमिंटन इतिहासात सिंधू सुवर्ण जिंकणारी पहिलीच खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय सायना नेहवाल हिने २०१५ आणि २०१७ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तर पुरुष गटात प्रकाश पादुकोण यांनी १९८३ साली आणि साई प्रणीय याने २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकली आहेत.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.