नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) थॉमस अँड उबर चषक स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेतून अनेक देशांनी माघार घेतली. थॉमस अँड उबर चषक पुढील महिन्यात ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमध्ये होणार होता. या स्पर्धेपासून आघाडीच्या बॅडमिंटन स्पर्धांना प्रारंभ केला जाणार होता.
-
Thomas and Uber Cup 2020 stands postponed! #badminton@bwfmedia https://t.co/s1ntoBiX3z
— BAI Media (@BAI_Media) September 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thomas and Uber Cup 2020 stands postponed! #badminton@bwfmedia https://t.co/s1ntoBiX3z
— BAI Media (@BAI_Media) September 15, 2020Thomas and Uber Cup 2020 stands postponed! #badminton@bwfmedia https://t.co/s1ntoBiX3z
— BAI Media (@BAI_Media) September 15, 2020
"जागतिक बॅडमिंटन फेडरेशन थॉमस आणि उबेर चषक २०२० यजमान बॅडमिंटन डेन्मार्कच्या संमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहे. अनेक स्पर्धक संघांनी नावे मागे घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे", असे बीडब्ल्यूएफने सांगितले.
शुक्रवारी इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियाने या स्पर्धेतून माघार घेतली. त्याआधी ऑस्ट्रेलिया, चीन तैपेई, थायलंड आणि हाँगकाँगच्या संघांनी आपली नावे मागे घेतली आहेत. विश्वविजेते पी.व्ही. सिंधू थॉमस अँड उबर चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार होती.
बीडब्ल्यूएफने म्हटले आहे की, डेन्मार्क ओपन १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होईल, तर २० ते २५ ऑक्टोबर रोजी होणारी डेन्मार्क मास्टर स्पर्धा रद्द केली गेली आहेत.