बर्मिंगहॅम - भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत तिने अमेरिकेच्या झांग बिविन हिचा २१-१४, २१-१७ अशा धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
सिंधूने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. एकवेळ सामना १६-१६ ने बरोबरीत होता. तेव्हा सिंधूने आक्रमक खेळ करत दुसऱ्या गेम २१-१७ ने जिंकला आणि सामन्यात बाजी मारली. सिंधूने जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी असलेल्या बिविनचा ४२ मिनिटात पराभव केला. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर कोरियाच्या सुंग जी ह्यूनचे आव्हान आहे.
मिश्र दुहेरीत चोपडा-रेड्डीचे आव्हान संपुष्टात -
मिश्र दुहेरीत भारतीय प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. त्यांना चीनच्या जोडीने २१-१३, ११-२१, २१-१७ असा पराभव केला.