नवी दिल्ली - भारताला २०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या बजरंग पुनियाला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात बजरंगला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Bajrang Punia for the field of Sports- Wrestling pic.twitter.com/90HZmWL7At
— ANI (@ANI) March 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Bajrang Punia for the field of Sports- Wrestling pic.twitter.com/90HZmWL7At
— ANI (@ANI) March 11, 2019Delhi: President Ram Nath Kovind confers Padma Shri award upon Bajrang Punia for the field of Sports- Wrestling pic.twitter.com/90HZmWL7At
— ANI (@ANI) March 11, 2019
बजरंगचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ साली झज्जर, हरियाणा येथे झाला. २४ वर्षाच्या बजरंगने भारतासाठी चांगली कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. ६१ किलोचा बजरंग ६५ किलो वजनी गटात विनोद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे प्रतिनिधित्व करतो.
बजरंगची कामगिरी
बुडापेस्ट २०१३ - कांस्यपदक
नवी दिल्ली आशिया चॅम्पियनशिप २०१३ - कांस्यपदक
अस्ताना आशिया चॅम्पियनशिप २०१४ - रौप्यपदक
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ - रौप्यपदक
इन्चियॉन आशियाई स्पर्धा २०१४ - रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धा सिंगापूर २०१६ - सुवर्णपदक
राष्ट्रकुल स्पर्धा ब्रेकपन २०१७ - सुवर्णपदक
अशगाबाद आशियाई मार्शल आर्टस गेम्स २०१७ - सुवर्णपदक
जागतिक अंडर-२३ कुस्ती चॅम्पियनशिप - रौप्यपदक
आशियाई चॅम्पियनशिप नवी दिल्ली २०१७ - सुवर्णपदक
राष्ट्रकुल स्पर्धा गोल्ड कोस्ट २०१८ - सुवर्णपदक
आशियाई खेल जकार्ता २०१८ - सुवर्णपदक
आशियाई चॅम्पियनशिप २०१८ - रौप्यपदक