मुंबई - प्रत्येक कलाकाराला पुरस्कार प्रिय असतो. एखादा पुरस्कार मिळणे म्हणजे चांगल्या अभिनयाची दखल घेणे असते आणि चांगल्या कार्याची पावती असते. तसेच केलेल्या चांगल्या कामावर शिक्कामोर्तब असतो. चित्रपटांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचा सन्मान करण्यासाठी अनेक वाहिन्या पुरस्कार सोहळा भरवतात जेथे पुरस्कार देऊन कलाकारांचे कौतुक तर केले जाते. परंतु संपूर्ण वाहिनी परिवार एकत्र येऊन नात्यांचा एक उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी झी मराठी वाहिनी सुद्धा ‘झी मराठी अवॉर्ड्स’ देत आपल्या कुटुंबातील कलाकारांचे कौतुक करत असते. याही वर्षी मराठी कलाकारांच्या मांदियाळीत झी मराठी अवॉर्ड २०२०-२१ मराठी कलाकारांच्या मांदियाळीत रंगला, 'उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा' या टॅग-लाईनसह.
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा २०२१ दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली आणि सोहळा अजूनच रंगतदार केला.
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा २०२१ यावर्षीच्या सोहळ्यात कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्यामुळे दरवर्षी एवढी गर्दी नव्हती परंतु उपस्थितांच्या उत्साहात जल्लोषाची अजिबात कमतरता नव्हती. मुंबई उपनगरातील मुलूंडच्या कालिदास सभागृहात ५०% आसनव्यवस्थेतही सर्व कलाकार एकमेकांना प्रोत्साहित करत होते व पाठ थोपटत होते. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत हा सोहळा संपन्न झाला.
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा २०२१ झी मराठीवरील मालिकांपैकी यंदा, माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, अग्गबाई सासूबाई, काय घडलं त्या रात्री?, कारभारी लाईभारी, लाडाची मी लेक ग! या मालिकांमध्ये तीव्र चुरस बघायला मिळणार आहे. ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा येत्या रविवारी २८ मार्च संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होईल.
‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळा २०२१ हेही वाचा - 'अजीब दास्तां'चा टिझर : चार विचित्र कथांचा अनोखा कोलाज