अभिनेता यशोमन आपटे म्हणजेच 'फुलपाखरू' या मालिकेतील आपल्या सगळ्याचा लाडक्या मानसला यंदाच्या 'मदर्स डे'ला अत्यंत गोड सरप्राईज मिळालं. कारण त्याची आई विदुला आपटे यांनी खास मदर्स डे साठी 'फुलपाखरू' या मालिकेच्या सेटला भेट दिली.
मदर्स डे म्हटला की, आई मुलाचं नात साजर करण्याचा दिवस. त्यामुळे आजच्या दिवशी आईला शांतपणे घरी आराम करायला सांगून आजीच्या मदतीने तिच्यासाठी चहा ब्रेकफास्ट आणि जेवण बनवून तिला सरप्राईज द्यायला आवडलं असत, असं यशोमनने सांगितलं आहे. मालिकेच्या चित्रीकरणामुळे ते शक्य नसल तरीही आपण कधीतरी ते नक्की करू असे त्याने ई टीव्ही भारताशी बोलताना सांगितलं आहे.
खर तर यशोमन त्याच प्रत्येक सिक्रेट आईसोबत शेअर करतो. मात्र अनेकदा आपल्या चांगल्यासाठी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. यापुढे आशा सगळ्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करेन, असं त्याने आईला सांगितलंय. तर यशोमनच्या आईला त्याच ग्लॅमर आणि यश याच कौतुक वाटत असल्याचं तीच सांगणं आहे. मालिकेमुळे यशोमन 10 दिवस घरी येऊ शकत नसला तरीही एखादा दिवस तो सोबत असला तरीही आपल्याला फार आनंद वाटतो, असं यशोमनच्या आईने सांगितलं आहे. मात्र जाता जाता ड्रायव्हिंग जपून करण्याचा सल्ला तिने यशोमनला दिलाय.
या दोघांशी या निमित्ताने गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..