ETV Bharat / sitara

'इमला' अन् 'रज्जू'सारख्या नाटकाचे लेखक वामन तावडे यांचे निधन - writer

तावडे यांच्या 'रज्जू' या नाटकाद्वारे अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर काही वर्षांनी हीच भूमिका अभिनेत्री लीना भागवत यांनीही साकारली होती.

वामन तावडे यांचे निधन
author img

By

Published : May 8, 2019, 7:48 AM IST

मुंबई - 'छिन्न', 'इमला', 'रज्जू', 'चौकोन' यासारख्या पुरस्कारप्राप्त नाटकाचे लेखक, आणि 'कन्स्ट्रक्शन', 'पिदी', 'मी घोडा हुसेनच्या चित्रातला', 'रायाची रापी', अशा एकांकीकांचे लेखक वामन तावडे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने मुलुंडमध्ये निधन झाले.

गेल्या चार दिवसांपासून छातीत दुखत असल्याने त्यांना मुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी संध्याकाळी साडे आठ वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात, असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त लेखक आपल्यातून निघून गेल्याची भावना नाट्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.

वामन तावडे यांचे पार्थिव मुलुंड पूर्व येथील त्यांच्या राहत्या घरी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून आज सकाळी १० वाजता मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनी जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तावडे यांच्या 'रज्जू' या नाटकाद्वारे अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर काही वर्षांनी हीच भूमिका अभिनेत्री लीना भागवत यांनीही साकारली होती. तर त्यांच्या 'तुम्ही आम्ही' या नाटकातून दलित चळवळीवर भाष्य करण्यात आले होते.

Intro:'छिन्न', 'इमला', 'रज्जू', 'चौकोन' यासारख्या पुरस्कारप्राप्त नाटकाचे लेखक, आणि 'कन्स्ट्रक्शन', 'पिदी', 'मी घोडा हुसेनच्या चित्रातला', 'रायाची रापी' अशा एकांकिकांचे लेखक वामन तावडे यांच आज दीर्घ आजाराने मुलुंडमध्ये निधन झालं. ते 69 वर्षांचे होते.

गेल्या चार दिवसांपासून छातीत दुखत असल्याने त्यांना मुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल संध्याकाळी साडे आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, जावई आणि नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त लेखक आपल्यातून निघून गेल्याची भावना नाट्यवर्तुळातून व्यक्त होतेय.

त्यांच्या 'रज्जू' या नाटकाद्वारे अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर काही वर्षांनी हीच भूमिका अभिनेत्री लीना भागवत यांनीही साकारली होती.

तर त्यांच्या 'तुम्ही आम्ही'या नाटकातून दलित चळवळीवर भाष्य करण्यात आलं होतं. अभिनेता संदीप कुलकर्णी आणि लेखिका आणि अभिनेत्री मनस्विनी लता रवींद्र हिने या नाटकात भूमिका साकारली होती.

वामन तावडे यांच पार्थिव चाळ नं सी ९, प्लाँट नं.२४ दत्तक्रुपा सोसायटी ,म्हाडा काँलनी, मुलुंड पूर्व येथील त्यांच्या राहत्या घरी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, उद्या सकाळी 10 वाजता मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनी जवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.