ETV Bharat / sitara

बदल घडवून आणण्यासाठी इच्छाशक्तीची गरज - दिया मिर्झा

समाजात बदल घडवून आणण्यासाठी फक्त सहानुभूती, करुणा आणि प्रारंभ करण्याच्या इच्छाशक्तीची गरज असते, असे मत अभिनेत्री दिया मिर्झाने व्यक्त केले आहे. 'भारत के महावीर' या मालिकेबद्दल ती बोलत होती.

Diya Mirza
दीया मिर्झा
author img

By

Published : Nov 27, 2020, 1:17 PM IST

मुंबई - अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, बदल हे सहानुभूती, करुणा आणि इच्छाशक्तीच्या हेतूने प्रेरित असतात. दियाने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "मला एक गोष्ट मला समजली आहे की, आपण बदल घडवून आणण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. यासाठी फक्त सहानुभूती, करुणा आणि प्रारंभ करण्याच्या इच्छाशक्तीची गरज असते."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'भारत के महावीर' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्‍या दियाने पुढे सांगितले, "तुम्ही समाजाचा विचार करणाऱ्या चांगल्या व्यक्ती असाल तर, तुम्ही आपली कृती दयाळूपणे आणि सहिष्णूतेने कराल. आम्ही केवळ बसून गोष्टी घडताना पाहू शकत नाही. आम्हाला बदल घडवून आणावा लागेल. पाहूयात हे कसे घडू शकेल. "

हेही वाचा - २०२१च्या ऑस्करसाठी भारताकडून मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड!

'भारत के महावीर' या मालिकेत कोरोना व्हायरस साथीच्या काळात कोणत्या न कोणत्या मार्गाने पुढाकार घेऊन लोकांची कशी मदत केली हे दाखवण्यात आले आहे.

दिया म्हणाली, "हे अशा लोकांची उदाहरणे आहेत जे म्हणतात की, 'मी माझा वेळ, माझी साधने, माझी ऊर्जा वापरणार आहे. माझी साधने कमी असतील तर, जे काही माझ्याकडे आहे त्यातून मी बदल घडवून आणेन.''

ही मालिका डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी प्लस अ‍ॅपवर प्रसारित केली जाते. ही मालिका संयुक्त राष्ट्रसंघ, एनआयटीआय आयोग आणि डिस्कव्हरी चॅनल यांच्या भागीदारीत तयार केली गेली आहे.

हेही वाचा - मला कडक अ‌ॅक्शनमध्ये हात आजमवायचा आहे - अनन्या पांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.