ETV Bharat / sitara

‘सरगम की साढेसाती’ करताना तरुणपण पुन्हा जगतोय - दर्शन जरीवाला - ‘सरगम की साढेसाती’ मालिका सोनी टीव्हीवर प्रसारित

साडेसाठी हा प्रकार प्रत्येकालाच नाडणारा आहे. याच विषयावरील ‘सरगम की साढेसाती’ ही विनोदी मालिका सरगम नावाची तरुणी आणि साडेसात या संख्येशी असलेले तिचे खास नाते यांच्याभोवती फिरते. ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

-darshan-jariwala
दर्शन जरीवाला
author img

By

Published : Mar 4, 2021, 6:04 PM IST

मुंबई - रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्याचे क्षण घालविण्यासाठी लोक टेलिव्हिजनचा सहारा घेतात. कार्यक्रमांसंदर्भात प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असल्या तरी विनोदी कार्यक्रम लहानमोठ्या सर्वांनाच आवडतात. त्यामुळेच प्रत्येक वाहिनीवर एक-दोन विनोदी कार्यक्रम असतातच असतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सरगम की साढेसाती’ हा एक नवीन विनोदी ‘सिटकॉम’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करीत मनाला गुदगुल्या करून हसवितो आहे.

भारतीय समाज ग्रह, तारे, पत्रिका, भविष्य ई. गोष्टींत रमतो. त्यातील बऱ्याच जणांना आपले सुख किंवा दुःखासाठी दुसऱ्याला क्रेडिट द्यावंसं वाटतं. यातील साडेसाठी हा प्रकार प्रत्येकालाच नाडणारा आहे. याच विषयावरील ही विनोदी मालिका सरगम नावाची तरुणी आणि साडेसात या संख्येशी असलेले तिचे खास नाते यांच्याभोवती फिरते. सरगमचे सासरे छेदिलाल (दर्शन जरीवाला) हे अवस्थी कुटुंबातील ज्येष्ठ पण अत्यंत कंजूष सदस्य आहेत आणि पैसे वाचवणे हेच त्यांच्या आयुष्यातील अंतिम ध्येय आहे. त्यांना अवस्थी परिवरावर हुकूमत गाजावायला आवडते आणि प्रत्येक सदस्याने त्यांच्या नियमांनुसार जगावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावणारे, आपल्या सह-कलाकारांसोबत आपला काम करण्याचा अनुभव सांगताना, दर्शन जरीवाला यांनी सांगितले, “ सरगम की साढेसातीच्या कलाकारसंचात वेगवेगळ्या पठडीचे गुणी, विचारवंत आणि गंमतीशीर कलाकार सहभागी आहेत, ज्यांच्यामुळे शूटिंगचे वातावरणच संपूर्णपणे बदलून गेले आहे. सेट्सवर तुम्हाला कधीच मरगळलेले वातावरण दिसणार नाही. इथे सतत हास्याच्या फैरी झडत असतात. मला या नवीन आणि तरुण कलाकारांसोबत काम करायला आवडते, कारण त्यांची भूक वेगळ्या प्रकारची आहे. ते खूप चुणचुणीत आहेत, मजेदार आहेत आणि एकंदरच त्यांची विचारप्रणाली वेगळ्या प्रकारची आहे.”

ते पुढे म्हणाले, “या मालिकेतले माझे सह-कलाकार इतके गंमतीशीर आणि उत्साहाने सळसळणारे आहेत की मला देखील वाटू लागते की मीही त्यांच्यातलाच एक आहे. मलाही तरुण झाल्यासारखे वाटते. त्यांना पाहून मला माझे पूर्वीचे शूटिंगचे दिवस आठवतात, जेव्हा आम्ही खूप हास्यविनोद, थट्टा-मस्करी करायचो, खोड्या काढायचो. त्यामुळे अशा तरुण कलाकारांबरोबर काम करणे खूप आल्हाददायक आहे.”

‘सरगम की साढेसाती’, ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.
हेही वाचा - नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका घेत आलेत अनुराग आणि तापसी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.