मुंबई - अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचा कमी वयातील मृत्यू फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीला धक्का देणारा आहे. त्याच्या मृत्यूचे खरे कारण पोस्ट मार्टमनंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनीही तपास सुरू असल्यामुळे याबाबतचा खुलासा केलेला नाही. मात्र मृत्यू होण्या अगोदर रात्री तो घराबाहेर पडला होता आणि जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या गाडीची काच फुटल्याचे आढळल्याने काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे.
हेही वाचा- अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज ओशिवरा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
सिध्दार्थ शुक्ला रात्री कोणाला भेटायला गेला होता?
सिध्दार्थचे कोणाशी भांडण झाले होते का?
हेही वाचा- सिध्दार्थच्या निधनाने शहनाझ गीलवर कोसळला दुःखाचा डोंगर
सिध्दार्थच्या बीएमडब्लू गाडीची मागची काच कशामुळे फुटली?
सिध्दार्थसोबत गाडीत आणखी कोण होते?
हेही वाचा- वाचा.... सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम
सिध्दार्थ काही कारणाने अस्वस्थ होता का?
अशा अनेक प्रश्न चाहत्यांसह नागरिकांना पडले आहेत. मुंबई पोलीस या प्रश्नांवरील उत्तरे शोधतील आणि मृत्यूच्या कारणांच्या मुळापर्यंत पोहोचतील अशी आशा करुयात.
हेही वाचा- सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले?