मुंबई - यूट्यूब स्टार प्राजक्ता कोली हिने तिच्या पहिल्या ब्रेकअपविषयी खुलासा शेअर करताना एक विचित्र परंतु मजेदार कथा सांगितली आहे. तिच्या एका बॉयफ्रेंडला तिच्यासोबत ब्रेकअप करायचे होते त्या प्रसंगाची ही गोष्ट आहे.
प्राजक्ता कोली आहे लोकप्रिय यूट्यूबर
१ जानेवारी २०२१ पर्यंत ६ दशलक्षाहूनही अधिक ग्राहक असलेल्या या अव्वल यु ट्यूबरने सोशल नेटवर्किंग साइटवर सर्वात विश्वासू टीम बनवली आहे. सोशल मीडियात प्रभावी असलेल्या प्राजक्ताने अलीकडेच राष्ट्रीय क्रश रोहित शराफसोबत नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज 'मिसॅमॅच्ड' यातून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.
'मिसॅमॅच्ड'च्या प्रमोशनच्यावेळी एका मुलाखतीदरम्यान, प्राजक्ताने तिच्या वास्तविक जीवनातील अपेक्षा आणि ब्रेकअपच्या कथेसह काही अनुभव शेअर केले.
यावेळी बोलताना रोहित म्हणाला, "पहिला ब्रेकअप व्हावा अशी कोणाचीही अपेक्षा नसते. खरंच. जर तुम्ही तसे केले तर तुमच्याबाबतीत काहीतरी विचित्र आहे." मात्र प्राजक्ता कोळीने मात्र आपण पहिल्या ब्रेकअपसाठी अपेक्षा केली होती, असे सांगितले. ही गोष्ट विचित्र वाटल्याने चकित झालेल्या रोहितने विचारले की, "एखादा ब्रेकअपची अपेक्षा कशी बाळगू शकतो?"
असा झाला पहिला ब्रेकअप
तिच्या पहिल्या ब्रेकअपची कथा सांगताना प्राजक्ता म्हणाली, "त्याने मला सांगितले, 'ऐक, मला खरंच तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मग तू मला बाहेर भेटशील का?' मी म्हणाले, 'ठीक आहे, मी तुला भेटेन.' त्याने चॉकलेट आणि टिशू आणले होते. त्याला वाटले होते की यामुळे मी कोलमडून पडेन. तो मला म्हणाला, 'प्राजक्ता मला माफ कर, मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचा आहे.' मी त्याकडे पाहिले आणि म्हणाले, 'ठीक आहे ब्रेकअप करूयात.'
ती पुढे म्हणाली, "मी परत माझ्या वडा पावकडे वळले आणि मग ती संपूर्ण गोष्ट घडली." प्रथम अयशस्वी संबंध तिला अजिबात त्रास देत नाही, असे प्राजक्ताने सांगितले.
हेही वाचा- कंगना रणौतने अर्जुन रामपालसोबत काढला फोटो, चर्चेला उधाण
सोशल मीडिया आणि ओटीटीनंतर आता प्राजक्ता अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी या कलाकारांसमवेत राज मेहताच्या 'जुग जुग जीओ' या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.