ETV Bharat / sitara

प्री-वेडिंग शूटची धमाल कॉमेडी असलेल्या 'वेडिंगचा शिनेमा'चा ट्रेलर प्रदर्शित - वेडिंगचा शिनेमा

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाचा टीजर आणि पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती.

'वेडिंगचा शिनेमा'चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Mar 26, 2019, 9:47 PM IST

मुंबई - लग्नसराई म्हटली की लगबग, गोंधळ, खरेदी, मानपान या सर्व गोष्टी आल्याच. त्यातच आता लग्नाआधीच्या प्री-वेडिंग शूटचीही क्रेझ वाढली आहे. मात्र, त्यासाठी करावी लागणारी तयारी आणि त्यातून होणारा गोंधळ 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी हे 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. या चित्रपटाचा टीजर आणि पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही लग्नाची लगबग पाहायला मिळते. या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, असे स्टारकास्ट झळकणार आहे.

डॉ. सलील कुलकर्णी यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह कथा, पटकथा, संवाद आणि संगीताची धुरा सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असलेला 'वेडिंगचा शिनेमा' १२ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

प्री-वेडिंग शूटची धमाल कॉमेडी असलेल्या 'वेडिंगचा शिनेमा'चा ट्रेलर प्रदर्शित

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.