ETV Bharat / sitara

पाहा, गुन्हा दाखल होऊनही पूनम पांडे म्हणते, 'ती अफवा आहे' - Poonam Pande news

वादग्रस्त मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे हिच्यावर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केलाय. मात्र आपण घरीच होतो आणि असे काही घडलेच नसल्याचा दावा पूनमने केलाय.

Poonam Pandey
पूनम पांडे
author img

By

Published : May 12, 2020, 4:41 PM IST

मुंबई - मॉडेल पूनम पांडेने लॉकडाऊन उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्याऐवजी, तिचा असा दावा आहे की ती घरी एक चित्रपट मॅरेथॉन पाहात होती आणि ती अगदी ठीक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम आणि तिच्या मित्रांवर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी कारवाई केली. तिचा मित्र सॅम अहमद याच्यासोबत ती नव्या कारमधून भरधाव जाताना रविवारी रात्री ८ वाजता लॉकडाऊनचे उल्लंघन झाले. ही कार जप्त करण्यात आली आहे.

पूनम ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सतत बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती चाहत्यां ना खूश ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. आपल्याला अटक झालेली नसल्याचे तिने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

तिने एक क्लिप शेअर करून काल रात्री आपण घरी सिनेमा पाहात होते असे म्हटलंय. सलग ३ सिनेमा पाहिल्याचे ती सांगते. परंतु अटक झाल्याची अफवा पसरली असून ती खोटी आहे. आपण घरी ठिक असल्याचेही तिने म्हटलंय.

रिपोर्ट नुसार पूनम आणि तिच्या मित्रावर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी कलम १८८ आणि २६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.