मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा - देशमुख यांची जोडी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघेही एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. मात्र, त्यांच्यातही छोट्या मोठ्या कुरबुरी पाहायला मिळतात. बॉलिवूडचं क्युट कपल मानले जाणाऱ्या रितेश - जेनेलियाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयफा अवार्ड्स सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये रितेश आणि जेनेलियाचाही सहभाग होता. दोघांचाही यावेळी ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही रितेश आणि जेनेलियाची भेट घेतली. रितेश आणि प्रिती दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. यावेळी रितेश प्रितीसोबत बोलण्यात गुंग झाला होता.
जेनेलिया देखील या दोघांच्या जवळच उभी होती. रितेश प्रिती सोबत बोलण्यात एवढा गुंतला होता, की त्याने जेनेलियाकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे सुरुवातीला दोघांचं बोलणं हसून ऐकणारी जेनेलिया नंतर त्याच्याकडे रागाने पाहत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.
हेही वाचा -पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायच्या लूकची भूरळ, पाहा व्हिडिओ
तिच्या या रिअॅक्शनवर सोशल मीडियावर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. भलेही तुम्ही सेलिब्रीटी असो, तुमची पत्नी जेव्हा तुमच्या सोबत असते आणि तुम्ही मैत्रिणींशी गप्पा करत असता, तेव्हा प्रत्येक पत्नीची अशीच रिअॅक्शन असते, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -सईचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट लूक प्रदर्शित