ETV Bharat / sitara

व्हिजुयल प्रोमोशनसाठी ‘सिंगल -विंडो’, “आब्रा-का-डाब्रा”!

ट्वेंटिफोरएटिवन पब्लिसिटी प्रा. लि. च्या माध्यमातून बॉलिवूड आणि एम-टाऊनच्या चित्रपटांची पोस्टरच्या माध्यमातून पहिली झलक दाखवणारे पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव आणि प्रिफेस स्टुडिओच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांच्या संकलनाचे काम पाहणारे फैसल महाडीक यांनी एकत्र येऊन 'आब्रा-का-डाब्रा' नावाची कंपनी सुरु केली आहे. दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, तसेच नव निर्मात्यांना 'आब्रा-का-डाब्रा'चा नक्कीच फायदा होईल.

आब्रा का डाब्रा
आब्रा का डाब्रा
author img

By

Published : May 2, 2021, 9:28 AM IST

मुंबई - लॉकडाऊनमध्ये लोकांनी अनेक देशी विदेशी चित्रपट पाहिले. चित्रपटगृहे बंद होती आणि घराबाहेर पडायला परवानगी नव्हती त्यामुळे ओटीटी वर अनेक चित्रपट पाहिले गेले. एखादा चित्रपट पाहावा की नाही, याचा अंदाज प्रेक्षक कसा बांधतात? साहजिकच चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांचा अनुभव बघून. चित्रपटाचे पोस्टर नेहमीच चित्रपटाची उत्सुकता वाढविणारे असावे असे जाणकार सांगतात.

व्हिजुयल प्रोमोशनसाठी ‘सिंगल -विंडो’
व्हिजुयल प्रोमोशनसाठी ‘सिंगल -विंडो’
चित्रपटाच्या प्रोमोशन्समध्ये आकर्षक पोस्टरला अतीव महत्व असते. तसेच ट्रेलर ‘कापणे’ हीदेखील कला आहे. ट्रेलर पाहूनच बरेचसे प्रेक्षक चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवतात. यावरूनच चित्रपट कसा असेल याची कल्पना येते आणि याचे श्रेय जाते ते पब्लिसिटी डिझायनर आणि ट्रेलर एडिटरला. या सगळ्याचे गणित जुळवताना दिग्दर्शक, निर्माता यांची चांगलीच धावपळ होते. हीच पायपीट थांबवून एकाच ठिकाणी ट्रेलर्स-प्रोमोज्, पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळाल्या तर? याच गोष्टींचा विचार करून ट्वेंटिफोरएटिवन पब्लिसिटी प्रा. लि. च्या माध्यमातून बॉलिवूड आणि एम-टाऊनच्या चित्रपटांची पोस्टरच्या माध्यमातून पहिली झलक दाखवणारे पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव आणि प्रिफेस स्टुडिओच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांच्या संकलनाचे काम पाहणारे फैसल महाडीक यांनी एकत्र येऊन 'आब्रा-का-डाब्रा' नावाची कंपनी सुरु केली आहे. दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, तसेच नव निर्मात्यांना 'आब्रा-का-डाब्रा'चा नक्कीच फायदा होईल.

संकलनामध्ये १८-१९ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे फैसल महाडीक आणि जवळपास १५० सिनेमाच्या वर पब्लिसिटी पोस्टर केलेलं डिझायनर सचिन गुरव सांगतात, "आब्रा-का-डाब्रा म्हणजेच मॅजिक! आज सोशल मीडियाच्या, ओटीटीच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक टीजर-ट्रेलर आणि पोस्टर जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना दिसतो, त्याच लूकवर ते या सिनेमाची दखल घेतात. सध्याचा कोरोना काळ बघता निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आमच्या कंपनीद्वारे ट्रेलर्स-प्रोमोज्, (Visual Promotion) पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या तीनही महत्वाच्या विभागांचं काम एकत्र एका छत्राखाली मिळावं हाच आमचा उद्देश आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.