मुंबई - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीचा टास्क सुरू आहे. जय आणि विशाल या टास्कमध्ये कॅप्टन पदाचे दावेदार आहेत. ‘ही पाईपलाईन तुटायची नाय’ या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चांगलचं रंगत आहे. मीनल आणि विकास याचबाबतीत चर्चा झाली परंतु दुसरीकडे जय आणि विकासमध्ये मोठा राडा झाला. त्याचप्रमाणे कॅप्टन्सीसाठी विशाल आणि जय एकत्र आले. उत्कर्ष, मीरा, जय तसेच विशाल आणि जय यांचे भन्नाट प्लॅनिंग बघून प्रेक्षक अवाक झाले.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखाद्या सदस्याशी मैत्री होते आणि त्या सदस्यासोबत अनेक गोष्टी देखील शेअर केल्या जातात. एका ग्रुपमध्ये असो वा वैयक्तिक गेम खेळत असो, या घरामध्ये सदस्यांच्या मैत्री होतात आणि त्या बर्याचदा घराबाहेर देखील तशाच राहतात. अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये घरामध्ये बनला होता. C ग्रुप... C म्हणजेच क्लिअर. ज्यामध्ये तृप्तीताई, स्नेहा वाघ, सुरेखाताई आणि दादूस होते. कितीही मतभेद झाले, राग आला तरीदेखील ती मैत्री तशीच राहिली. आज दादूस यांना घरामध्ये तृप्ती ताईंची सारखी आठवण येत होती. ते म्हणाले, “तृप्ती मॅडमना मिस करतो आहे. आठवण आली मला. तृप्ती मॅडम मिस यू... सगळेजण आम्ही तुम्हाला मिस करतो आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. हिंदी नंतर मराठी बिग बॉस देखील तितकाच लोकप्रिय ठरला होता. २०१८ पासून बिग बॉसच्या मराठी सिझनला सुरुवात झाली.
पहिल्या सिझनमध्ये मेघा धाडे विजेती ठरली होती तर पुष्कर जोग उपविजेता घोषित झाला होता. दुसऱ्या सिझनमध्ये शिव ठाकरेच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली होती व नेहा शितोळेला उपविजेतेपद मिळाले होते. दोन्ही सिझनमध्ये भरपूर वादविवाद झाल्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत राहिला होता. तिसऱ्या सिझनमध्येही भरपूर मनोरंजन होत आहे.