हैदराबाद - दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने २०१९ च्या 'मोस्ट डिझायरेबल मॅन'च्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. सलग दुसऱ्यांदा तो या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम राहिला आहे. प्रभास आणि राम चरण यांसारख्या अभिनेत्यांना मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले आहे.
'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामुळे विजय देवरकोंडा लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याचे 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' हे चित्रपटही सुपरहिट झाले. अभिनेत्री रश्मिका मंदानासोबतची त्याची जोडी तेलुगू सिनेसृष्टीत लोकप्रिय आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सध्या तो 'वर्ल्ड फेमस लव्हर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच अभिनेत्री अनन्या पांडेसोबतही तो एका चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. पुरी जगन्नाथ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हिंदीसह हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -EXCLUSIVE : '९९ साँग्स'चे दिग्दर्शक विश्वेष कृष्णमूर्ती यांच्याशी खास बातचित