ETV Bharat / sitara

विकी जैनच्या प्रपोजलवर अंकिताने दिलं असं उत्तर, फोटो व्हायरल - relationship

सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चाही झाल्या.

विकी जैनच्या प्रपोजलवर अंकिताने दिलं असं उत्तर, फोटो व्हायरल
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:28 AM IST

मुंबई - 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली 'अर्चना' म्हणजेच अंकिता लोखंडे हिच्या आयुष्यात आता उद्योजक असलेल्या विकी जैनची एन्ट्री झाली आहे. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. आता विकीने अंकिताला एखाद्या रोमॅन्टिक हिरोप्रमाणे प्रपोज केले आहे. त्याचे काही फोटो शेअर करत अंकितानेही मजेशीर उत्तर दिले आहे.

'यावर मी विचार करेन', असे कॅप्शन देत अंकिताने दोघांचेही फोटो शेअर केले आहे.

कोण आहे विकी जैन
विकी जैन हा मुंबईतील एक व्यावसायिक तसेच बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. दोघांच्याही जवळच्या व्यक्तींना या नात्याबद्दल ठाऊक आहे. दोघेही बरेचदा बॉलिवूड इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते.

सुशांतसोबत ६ वर्षे होती रिलेशनशिपमध्ये
'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांतची ओळख झाली होती. दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांनाही फार आवडत होती. त्यांच्या जोडीच्या लोकप्रियतेमुळे ही मालिकाही टीआरपीमध्ये नंबर एकवर होती. त्यानंतर दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. सुशांतने अंकिताला एका डान्स कार्यक्रमात प्रपोज केले होते. दोघेही ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मात्र, त्यांच्यात दुरावा आला. दोघांनीही अद्याप त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगितले नाही.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत आता बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला आहे. तर, अंकितानेही 'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री घेतली आहे. दोघेही आपल्या आयुष्यात समोर गेले आहेत. आता अंकिता आणि विकीच्या नात्याची सुरुवात झाल्यामुळे विकीच्या प्रप्रोजलवर अंकिता काय उत्तर देते, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.