ETV Bharat / sitara

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मैत्री ट्रस्टकडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना आर्थिक मदत - मोहन जोशी

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मैत्री ट्रस्टकडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना दीड लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. हा छोटे खानी कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आवारात झाला.

Veteran actor Mohan Josh
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी
author img

By

Published : Jun 22, 2020, 9:29 PM IST

पुणे - ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मैत्री ट्रस्टकडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना दीड लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांच्याकडे आज हा धनादेश देण्यात आला. यावेळी विश्वस्त श्रीराम रानडे, विश्वस्त राजन मोहाडीकर, कोथरूड नाटय परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, अरुण पोमण , पालिकेच्या नाटयगृहांचे व्यवस्थापक सुनील मते तसेच सुमारे ६० बॅक स्टेज आर्टिस्ट उपस्थित होते. हा छोटे खानी कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आवारात झाला.

मैत्री ट्रस्ट कडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना आर्थिक मदत

राजन मोहाडीकर म्हणाले, ' कोविड काळात रंगभूमी सेवक अडचणीत आहेत. घरची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत मैत्री ट्रस्ट मदतीचा हात घेऊन आले आहे. 'ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा ट्रस्टला २० हजाराची मदत करण्यात आली. मोहन जोशी यांनीच सर्वांचे आभार मानले. रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले म्हणाले, 'रंगभूमी सेवकांचे घर चालले पाहिजे, यासाठी या निधीतून रेशन किट देण्यात येणार आहे. गणपतीच्या काळात थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अतुल पेठें , विजय पटवर्धन यांच्यापासून अनेक अभिनेते मदतीसाठी पुढे येत आहेत.

मोहन जोशी म्हणाले, ' रंगभूमी अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक मदतीचे हात लागणार आहेत. रंगभूमी अजून २ महिने सुरू होईल असे वाटत नाही. पण, रंगभूमी मरणार नाही. पुन्हा जोमाने उभारी मिळेल.'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.