ETV Bharat / sitara

वैशाली माडेची मुलगी म्हणतेय; आईच्या हाती बिग बॉसची ट्रॉफी, हेच माझं बर्थडे गिफ्ट असेल - birthday

बिग बॉसची स्पर्धक वैशाली माडे यावेळी मुलीच्या वाढदिवसाला हजर राहू शकणार नाही. 19 जुलैला वैशालीची मुलगी आस्थाचा वाढदिवस आहे. परंतु याचे छोट्या आस्थाला फारसे दुःख नाही. आईने विजेते व्हावे, तिच्या हाती ट्रॉफी पाहून तेच आपले बर्थडे गिफ्ट असणार असल्याचं आस्थाने म्हटलंय.

वैशाली माडे आणि मुलगी आस्था
author img

By

Published : Jul 12, 2019, 3:22 PM IST

महागायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र आपल्या मुलीसोबत वाढदिवसाच्या दिवशी नसणार आहे.

19 जुलैला वैशालीच्या मुलीचा आस्थाचा वाढदिवस आहे. जुलै महिना सुरू झाल्यावर वैशालीने यंदा आपण आस्थासोबत वाढदिवशी नसल्याची बिग बॉसमध्ये खंत व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली होती, “आस्थाचा बर्थ डे मंथ आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार. म्हणजे आता पुढच्या वर्षी माझी मुलगी टिनेजर होणार यावर खरं तर विश्वासच बसत नाही. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आता तर जन्माला आली होती. मी घरात असताना तिचा सतत ममा-ममाचा घोष चालु असतो. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस ?”

यावर वैशालीच्या मुलीने तिच्यासाठी एक मेसेज रेकॉर्ड केलाय. आस्था म्हणते, “माझे आजवरचे वाढदिवस दिमाखदार पध्दतीने साजरे व्हावेत, आणि ते मेमरेबल असावेत, यासाठी माझी आई दरवर्षी खूप छान नियोजन करायची. वाढदिवसाच्यावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच टाइम स्पेंड करायची. यंदा मात्र मी ममाला खूप मिस करेन. पण ममा तू माझी काळजी करू नको. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे. तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि 1 सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”

Intro:सुमन काकी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या 'लागीरं झालं जी' मधली शिवानी घाटगे,शीतलीच्या काकीच्या भूमिकेतील शिवानी आता थेट रुपेरी पडद्यापर्यंत. लवकरच सुमन काकी उर्फ शिवानी घाटगे 'पळशीची पीटी' या मराठी चित्रपटातून एका नव्या भूमिकेत रंग भरायला सज्ज आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित 'पळशीची पीटी' या चित्रपटातून शिवानी मुख्याध्यापिका माळी बाईंच्या भूमिकेत दिसणार असून येत्या २३ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या 'पळशीची पीटी' या चित्रपटाची कथा 'भागी' नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शिक्षकांची भूमिका किती मौल्यवान असते हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'पळशीची पीटी' मध्ये शिवानी हेच सत्य मुख्याध्यापिका माळी बाईंच्या रुपाने उलगडणार आहे. या भूमिकेविषयी तिला विचारलं असता, ''हा माझा पहिलाच चित्रपट असून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांची मी आभारी आहे की त्यांनी माझ्यातले कलागुण ओळखले. 'पळशीची पीटी' चित्रपटातील मुख्याध्यापिका माळी मॅडम साकारणं माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मालिकेत मी एका समंजस गृहिणीची भूमिका साकारली होती जी प्रथम कुटुंबाचा विचार करते पण मुख्याध्यापिका माळी हे एक करारी व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या हाती संपूर्ण शाळेची आणि उद्याच्या होतकरू युवा पिढीची जबाबदारी आहे. थोडं कठीण होतं पण दिग्दर्शकांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे काम बरंच सोप्पं झालं''  

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजला गेलेल्या 'पळशीची पीटी'मध्ये शिवानी सोबतच ऍथलेट 'भागी'च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे आणि राहुल मगदूम झळकणार आहे. शिवाय काही कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यात असून लवकरच त्यांची नावे प्रेक्षकांसमोर येतील. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.