ETV Bharat / sitara

उमर रियाझसाठी १७ मिलीयन ट्विट्स, बिग बॉसचा सर्वात ट्रेंडिंग स्पर्धक - उमर रियाझसाठी १७ मिलीयन ट्विट्स

बिग बॉस 15 मधून बाहेर काढण्यात आलेल्या उमर रियाझने ट्विटरवर इतिहास रचला आहे. उमरचे चाहते त्याच्या हकालपट्टीने हैराण झाले आहेत आणि शोच्या निर्मात्यांना ट्विटरवर बरेच सुनावत आहेत. सोशल मीडियावर आतापर्यंत 17 मिलीयन ट्विट आले आहेत.

Umar Riaz
Umar Riaz
author img

By

Published : Jan 13, 2022, 7:49 PM IST

मुंबई - टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा 15वा सीझन सुरू आहे. सध्याच्या हंगामात बेघर झालेल्या उमर रियाझला बाहेर काढल्याने ट्विटरवर खळबळ उडाली आहे. ट्विटरवर त्याच्या बाजूने 17 दशलक्षाहून अधिक ट्विट झाले आहेत. बिग बॉसच्या कोणत्याही स्पर्धकासाठी हा इतिहास आहे. उमरला शोमधून काढून टाकल्यानंतर चाहते शोच्या निर्मात्यांविरोधात गदारोळ करत आहेत.

पब्लिक विजेता उमर रियाझ हा हॅशटॅग ( #Public Winner Umar Riaz ) ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. गेल्या चार दिवसांपासून उमर रियाझचे चाहते ट्विटरवर शो मेकर्सला शिव्या देत आहेत. त्याचवेळी उमरने ट्विटरवर येऊन या ऐतिहासिक पाठिंब्याबद्दल चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. उमरने 16 लाख ट्विटसह एक फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. उमरने ट्विटरवर लिहिले की, 'माझ्याकडे शब्द नाहीत'.

गेल्या वीकेंड का वार भागात सलमान खानने उमर रियाझला बाहेर काढण्याची घोषणा केली होती. बिग बॉस 15 चे आतापर्यंतचे हे सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होते. गेल्या आठवड्यात एका टास्कमध्ये प्रतीक सहजपाल आणि उमर रियाझ यांच्यात भांडण झाले होते. घराचे नियम तोडल्याबद्दल बिग बॉसने उमरला नॉमिनी लिस्टमध्ये ठेवले, त्यानंतर त्याला वीकेंड का वारमध्ये घर सोडावे लागले.

बेघर झाल्याबद्दल उमरने ट्विट केले होते की, ''माझी जनता माझी आर्मी कधीही मला बाहेर काढू दे, पाठिंबा देणार नाही असे कध होऊ शकत नाही. हे असंभव आहे. मी माझ्या प्रत्येक चाहत्यांचे आभार मानतो."

उमर रियाझच्या आधी, अनेक बिग बॉस स्पर्धक देखील ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये होते. यात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, रुबिना डिलाक, शहनाज गिल, राहुल वैद्य आणि जास्मिन भसीन यांच्या नावाचा समावेश होता, परंतु उमर रियाझने या शर्यतीत त्या सर्वांना मागे टाकले आहे.

हेही वाचा - पंजाब निवडणुकीत बहिणीचा प्रचार करणार नाही सोनू सूद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.