ETV Bharat / sitara

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत अखेर राणादाचा एन्काऊंटर होणार..? - राणा याच्या एन्काऊंटरची योजना

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेचा नायक राणा याच्या एन्काऊंटरची योजना आखण्यात आली आहे. त्याच्यावर गोळी सुटते...त्यामुळे या मालिकेत पुढे काय घडणार ही उत्सुकता ताणली आहे.

Tuzyat Jiv Rangala serial
'तुझ्यात जीव रंगला
author img

By

Published : Jul 27, 2020, 9:06 PM IST

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळविलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राणाने तुरुंगातून पळ काढला होता. पुरावे शोधण्यासाठी आणि पोलिसांपासून लपण्यासाठी तो रानोमाळ हिंडत होता. अंजलीला वाटतं की राणाने शरण जावं. रितसर कोर्टकचेरीने प्रश्न मार्गी लागेल. यावरुनच दोघांमध्ये वाद सुरु आहे.

दिवसेंदिवस मामा, माधुरी, पप्या अंजलीसमोर असं चित्र उभं करत आहेत की अंजलीला सुद्धा राणा चुकीचं वागत असल्याचं पटू लागलंय. अशातच राणा एका बेसावध क्षणी पकडला जातो. मोहिते आणि मामाची युती झाल्याने मोहिते राणाचं गुपचूप एन्काऊंटर करण्यासाठी त्याला मामाच्या ताब्यात देतो. राणाच्या एन्काऊंटरचा दिवस ठरतो. तिकडे अंजली राणाला शोधतेय..तर दुसरीकडे राणाला शेवटचा निरोप देण्याची तयारी झालीये...अखेर मोहितेच्या बंदूकीतून गोळी सुटते... आणि पुढे नक्की काय होत ते जाणून घेण्यासाठी आपल्याला हा एपिसोड पहावा लागणार आहे.

राणाच्या एन्काऊंटरनंतर पुढे काय घडणार ? राणा निर्दोष होता हे अंजलीला कळणार का ? का राणादाच्या एन्काऊंटरसह मालिकेचा करुण शेवट होणार ..? का याशिवाय काही वेगळा ट्विस्ट यानिमित्ताने मालिकेत पहायला मिळणार याची उत्सुकता कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.