ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्धला आता अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीय! - ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर

‘आई कुठे काय करते’
author img

By

Published : Jun 8, 2021, 4:19 PM IST

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रतिसादामुळेच मालिकेने २५० भागांचा टप्पा नुकताच गाठला होता. स्टार प्रवाहवरील हीच प्रेक्षकप्रिय मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीय. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे. संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय आणि अभिषेकनेही अंकिताला सक्त ताकीद दिलीय ही वळणं प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी आहेत.

‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर

द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. एकीकडे अनिरुद्धचं दुटप्पी धोरण तर तिकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय.

‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर

अभिषेकने लग्न करावं म्हणून अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकिताने खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे. अंकिताचा खोटारडेपणा उघड झालाच तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिलीय. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत.

‘आई कुठे काय करते’ मालिका रंजक वळणावर

‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - मानहानी प्रकरण; सलमान खानचा न्यायालयात नव्याने अर्ज दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.