मुंबई - छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील 'विक्रांत सरंजामे' आणि 'ईशा' हे पात्र घराघरात पोहोचले आहे. अभिनेता सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची केमेस्ट्रीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गायत्री दातार हिने या मालिकेद्वारेच छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आता लवकरच ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आगामी 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
दाक्षिणात्य चित्रपट 'अंगमली डायरीज' या चित्रटाचा रिमेक असलेला 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील हा मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत गायत्रीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गायत्रीने या चित्रपटाबाबत सांगितले होते, की 'या चित्रपटात ती कोल्हापूरच्या मुलीची भूमिका साकारत आहे. मालिकेत मी ज्याप्रकारे 'ईशा'चे पात्र साकारते, त्या पात्राच्या अगदी उलट या मुलीची भूमिका आहे'.
'कोल्हापूर डायरिज'चे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. या चित्रपटात 'ईशा' म्हणजेच गायत्री हिचा लूक कसा असेल, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Intro:Body:
'तुला पाहते रे' मधील ईशाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री, 'या' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Conclusion: