‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हारच्या पत्रिकेतील दोषाच निवारण करण्यासाठी खानविलकर कुटुंब तुलादान आणि पूजेची योजना आखतात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असतो. जीव माझा गुंतला मालिकेमध्ये मल्हार आणि श्वेताचं लग्न ठरले आहे. लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. लग्नानंतरचे दोघांचे आणि त्याआधी दोघांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये म्हणून पूजा केली जाते आणि म्हणूनच मल्हारने त्याच्या होणार्या बायकोसोबत ही पूजा करणं अपेक्षित आहे.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेत संकटमोचन तुला-दान पूजा अंतरामुळेच होणार पूर्ण! - खानविलकर कुटुंब तुलादान
मालिकेत चांगल्या गोष्टी घडताना विघ्न हे येतेय. त्याच अनुषंगाने मालिकेतील चित्रा काकी या होणार्या पूजेमध्ये काही ना काही कुरघोड्या करते आहे, जेणेकरून पूजा निर्विघ्नपणे पार पडू शकणार नाही. चित्रा काकीच्या अश्या विचित्र वागणुकीमुळे मल्हार थोडा गोंधळलेला आहे. ती अशी का वागते आहे याचं नेमकं कारण अजून मल्हारला माहिती नाही. पण, काकीने ठरवले आहे श्वेताच सत्य ती संपूर्ण कुटुंबासमोर आणणार.