मुंबईः जुन्या अभिजात गाण्यांचे रिमिक्स करण्याचा ट्रेंड हा गाणी प्रासंगिक ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे मत निर्माता भूषण कुमार यांनी व्यक्त केले आहे.
2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात गाण्याच्या मुळ वैशिष्ठ्यांसह साऊंड ट्रॅक आणि रेट्रो गाण्यांचे रिमिक्स होत होते.
चित्रपटाच्या अल्बममधील गाण्यांचे रिमिक्स वगळता अक्षरशः कमी होत चाललेला हा ट्रेंड टी-सीरीझने अलिकडच्या वर्षांत बऱ्याच गाण्यांचे रिमिक्स करुन कायम ठेवला आहे.
बॉलिवूडमध्ये जुन्या गाण्यांचे रिक्रिएशनची पध्दत सुरू झाली आहे. जुनी गाणी तरुण पिढीसाठी लोकप्रिय करण्याचा एक मार्ग असल्याचे भूषण कुमार म्हणाले.
''आमच्या कंपनीकडून किंवा इतरांकडून तयार करण्यात आलेली अशी गाणी ही जुन्या काळीतील सोनं होती. आजही ती ऐकण्याची आवश्यकता आहे.''
"ज्यांनी यापूर्वी त्यांना ऐकलेले नाही अशा गाण्यांचे रिमिक्स करणे हा आजच्या तरुणांसाठी लोकप्रिय करण्याचा एक मार्ग आहे. रिमिक्स गाण्यामुळे साचलेपण निर्माण होईल यावर माझा विश्वास नाही,'' असेही भूषण कुमार म्हणाले.
असे असले तरी या रिमिक्स गाण्याच्या ट्रेंडला सर्वांची पसंती आहे असे नाही. अलिकडेच टी सिरीजने बनवलेल्या 'मसकली' गाण्याच्या रिमिक्सवर प्रचंड टीका झाली होती. इतकेच नाही तर संगीतकार ए आर रहेमान, गीतकार प्रसून जोशी आणि गायक मोहित चौहान यांनीही याला विरोध केला होता. तरीदेखील रिमिक्स गाण्याची ही शृंखला कायम राहणार असल्याचे भूषण यांचे म्हणणे आहे.