ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफने ‘कॅसानोवा‘ चा टिझर-ट्रेलर केला प्रदर्शित - ‘कॅसानोवा‘ चा टिझर-ट्रेलर

टायगर उत्तम गायकसुद्धा आहे आणि गेल्या वर्षी त्याने ‘अनबिलीव्हेबल’ या गाण्याने अधिकृतरीत्या गाण्यांच्या दुनियेत प्रवेश केला. तो आता अजून एक नवीन गाणे घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे ‘कॅसानोवा’. नुकताच त्याने या गाण्याचा टिझर-ट्रेलर प्रदर्शित केला.

Tiger Shroff
टायगर श्रॉफ
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सर्वात तरुण अॅक्शन स्टार, अभिनयासोबतच नृत्य पारंगत आहे. त्याच्यातील अजून एक गुण त्याने प्रेक्षकांसमोर ठेवला, तो म्हणजे गायनाचा. टायगर उत्तम गायकसुद्धा आहे आणि गेल्या वर्षी त्याने ‘अनबिलीव्हेबल’ या गाण्याने अधिकृतरीत्या गाण्यांच्या दुनियेत प्रवेश केला. त्या गाण्याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्यामुळे टायगरला हुरूप नक्कीच मिळाला. तो आता अजून एक नवीन गाणे घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे ‘कॅसानोवा’. नुकताच त्याने या गाण्याचा टिझर-ट्रेलर प्रदर्शित केला.

'कॅसानोवा' मधून टायगर श्रॉफचा अप्रतिम नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. या गाण्यात पांढऱ्या-काळ्या कोट घातलेला दिसेल ज्यातून त्याचे अॅब्स दिसताहेत जे तरुणींना घायाळ करतील. त्याची त्याच्या डान्स-पार्टनर सोबतची केमेस्ट्री वाखाणण्याजोगी आहे आणि त्याच्या नृत्याबद्दल तर बोलायलाच नको.

Casanova
‘कॅसानोवा‘ चा टिझर-ट्रेलर प्रदर्शित

‘कॅसानोव्हा’ ची निर्मिती सुद्धा टायगर श्रॉफने केली असून त्याचे निर्मितीक्षेत्रातील हे पहिले पाऊल आहे. या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा ​​यांनी केले असून छायाचित्रण केले आहे डीओपी संथा यांनी. क्यूकी आणि टायगर यांची निर्मिती असून, अवितेश यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. म्युझिक प्रॉडक्शन ट्रॅकफोरमाझ यांनी केले आहे आणि नृत्यदिग्दर्शक परेश यांची कोरिओग्राफी आहे.

हेही वाचा - 'तान्हाजी'ला एक वर्ष पूर्ण, अजय, काजोलने टीमसह केला जल्लोष

टायगर या वर्षी तीन चित्रपटांतून, ‘बागी ४’, ‘हीरोपंती २’ आणि ‘गणपत‘, प्रेक्षकांसमोर येणार आहे, सर्वात तरुण अ‍ॅक्शन सुपरस्टार आणि आता रॉकस्टार बनलेल्या टायगर श्रॉफ ची उत्तरोत्तर होणारी प्रगती त्याच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारी असेल.

हेही वाचा - 'त्रिभंगा'त काम करणे अभिनयाच्या मास्टर क्लासहून वेगळे नाही - वैभव तत्ववादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.