ETV Bharat / sitara

ललित प्रभाकर, अभय महाजन व आलोक राजवाडे यांची ‘शांतीत क्रांती'!

'शांतीत क्रांती' ही नवी वेब सिरीज सोनी लिव्हवर प्रसारित झाली आहे. मजा, मस्ती धमाल उडवणाऱ्या तीन मित्रांची ही एक वेगळी गोष्ट आहे. हे तिघेही स्‍वयं-शोधाच्‍या प्रवासावर जातात, जो नकळतपणे त्‍यांच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी देतो. आपण जीवनामध्‍ये पुढे जात असताना खरे मित्र आपले आधारस्‍तंभ बनतात, आपल्‍या अनुभवांमध्‍ये मोलाची भर करतात, आपले जीवन अविरत आठवणींनी भरून टाकतात.

'शांतीत क्रांती'
'शांतीत क्रांती'
author img

By

Published : Aug 20, 2021, 4:13 PM IST

धमाल, मौजमजा व मैत्रीवर भाष्य करणारी 'शांतीत क्रांती' ही प्रेक्षकांना विचार करण्‍यास भाग पाडणारी सिरीज असेल. ही सिरीज प्रत्‍येक मैत्रीमध्‍ये आवश्‍यक असलेला समजूतदारपणा व उद्देशावर प्रकाश टाकते. ही कथा ३ जिवलग मित्र श्रेयस, दिनार व प्रसन्‍न यांच्‍या विलक्षण साहचर्याला दाखवते. हे तिघेही स्‍वयं-शोधाच्‍या प्रवासावर जातात, जो नकळतपणे त्‍यांच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी देतो. आपण जीवनामध्‍ये पुढे जात असताना खरे मित्र आपले आधारस्‍तंभ बनतात, आपल्‍या अनुभवांमध्‍ये मोलाची भर करतात, आपले जीवन अविरत आठवणींनी भरून टाकतात.

‘शांतीत क्रांती' चे कथानक श्रेयस, दिनार व प्रसन्‍न यांच्‍यामधील अतूट नात्‍याला सादर करते यांच्या भूमिका अनुक्रमे या सिरीजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवाडे व ललित प्रभाकर यांनी साकारल्या आहेत. कायमस्‍वरूपी तरूण व काळजी-मुक्‍त असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या या तिघांचा हा प्रवास त्‍यांच्‍या मैत्रीला आव्‍हान करतो व यामधून आत्‍मपरीक्षण व साक्षात्‍काराच्‍या प्रवासाला सुरूवात होते. चढ-उतार, ट्विस्‍ट्स व वळण आणि जीवनाशी संबंधित शिकवण या सिरीजला पाहण्‍यासाठी सर्वागीण व अविस्‍मरणीय बनवतात.

ही सिरीज आठवण करून देईल की गंतव्‍यस्थान नाही तर त्यापर्यंत पोहोचविणारा प्रवास महत्त्वाचा असतो. विनोदी स्‍वरूपात सिरीज जीवनातील चढ-उतारांचा सामना करण्‍याच्‍या पद्धतींना दाखवते. श्रेयस नात्‍यामधील आव्‍हानांशी सामना करत असतो, प्रसन्‍न पूर्ण न झालेल्‍या स्‍वप्‍नांच्‍या तणावाचा सामना करत असतो आणि दिनार जीवनातील अनपेक्षित गोष्‍टींचा सामना करत असतो. ही सिरीज हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने या पात्रांच्‍या पुढे जाणा-या जीवनप्रवासाला सादर करते.

दिग्‍दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्‍लीन म्हणाले, ''कथा, अनुभव, हास्‍य आणि त्‍यामधून मिळणारा संदेश या सिरीजला पाहण्‍यासाठी अत्‍यंत रोमांचक बनवतात. 'शांतीत क्रांती' ही पडद्यावर सादर करण्‍यात आलेली प्रत्‍येकाची कथा आहे. आम्‍हाला खात्री आहे की, सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षक या सिरीजशी संलग्‍न होतील. आम्‍ही प्रेक्षकांना 'शांतीत क्रांती'सह आरामात मनोरंजनाचा आनंद घेताना पाहण्‍यासाठी उत्सुक आहोत.''

आशिष गोलवलकर, प्रमुख - कन्‍टेन्‍ट, एसईटी व डिजिटल बिझनेस, सोनी लिव्ह, म्हणाले की, ''आम्‍ही आमच्‍या प्रादेशिक कन्‍टेन्‍टची श्रेणी अधिक प्रबळ करत असताना आम्‍हाला दोन कन्‍टेन्‍ट पॉवरहाऊसेस टीव्‍हीएफ आणि भाडिपासोबत सहयोगाने आमची पहिली मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'ची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. 'शांतीत क्रांती' ही सिरीज आजच्‍या शहरी तरूणांमध्‍ये अधिक प्रमाणात दिसून येणा-या मैत्रीच्‍या ख-या साराला सादर करते.”

या सिरीजमध्‍ये अभय महाजन, ललित प्रभाकर व आलोक राजवाडे यांच्यासोबत विजय निकम व लोकप्रिय बॉलिवुड अभिनेत्री शिखा ताल्‍सानिया हे देखील मुख्‍य भूमिकेत आहेत. सखी गोखले, मृण्‍मयी गोडबोले, अमेय वाघ, सारंग साठये, जितेंद्र जोशी हे कलाकार खास उपस्थिती दर्शवणार आहेत.

'भारतीय डिजिटल पार्टी' (भाडिपा) चे संस्‍थापक सारंग साठये व पौला मॅकग्‍लीन दिग्‍दर्शित 'शांतीत क्रांती' परिपूर्ण फ्रेण्‍डशीप डे ऑफरिंग आहे. मैत्रीच्‍या या अतूट नात्‍याला प्रशंसित करत हृदयस्‍पर्शी मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती' प्रदर्शनासाठी सज्‍ज आहे. ३ मित्र, एक रोड ट्रिप आणि एक अविस्‍मरणीय प्रवास अधोरेखित करणारी ही सिरीज सोनीलिव्‍हवर १३ ऑगस्‍ट २०२१ पासून पाहता येईल. तसेच ही सिरीज हिंदी, तमिळ, तेलुगु व मल्‍याळममध्‍येसुद्धा डब करण्‍यात आली आहे.

हेही वाचा - आता 'बिग बी'चा आवाज घुमणार अमेझॉन अलेक्सावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.