ETV Bharat / sitara

शक्तिमानसोबत दूरदर्शवर येतोय मोगली, ही आहे 'द जंगल बुक'ची वेळ - दूरदर्शवर येतोय मोगली

लॉकडाऊनच्या काळात घरी थांबलेल्या प्रेक्षकांसाठी रामायण, शक्तिमान सारख्या मालिका दूरदर्शनवर दाखवल्या जात आहेत. यात आता जंगल बुक या गाजलेल्या मालिकेची भर पडली आहे. ही मालिका आता दुपारी १ वाजता प्रसारित होणार आहे.

Jungle Book back on Doordarshan
द जंगल बुक
author img

By

Published : Apr 8, 2020, 3:29 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे कठिण आहे. अशावेळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनने एकेकाळी गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यात रामायण, महाभारत, सर्कस, शक्तिमान आणि ब्योमकेश बख्शी यासारख्या मालिकांचा समावेश आहे. यात आता नवीन भर डली असून जंगल बुक ही गाजलेली मालिका ८ एप्रिलपासून दुपारी १ वाजता दाखवली जाणार आहे.

दूरदर्शनने मोठ्यांसह छोट्या बच्चे कंपनीचा विचार करुन जंगल बुक प्रसारित करण्याचा निर्णय घेतलाय. याची घोषणा दूरदर्शनच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलीय.

  • शाम 5 बजे @DDNational पर वक्त है मशहूर निर्देशक रमेश सिप्पी द्वारा निर्देशित धारावाहिक 'बुनियाद' का।#Buniyaad pic.twitter.com/POsyl1D4Rv

    — Doordarshan National (@DDNational) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याबरोबरच दूरदर्शनवर बुनियाद ही रमेश सिप्पींची मालिकाही दाखवली जाणार असल्याचे दूरदर्शनने जाहीर केले आहे. ही मालिका संध्याकाळी ५ वाजता प्रसारित होणार असल्याचे दूरदर्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लोकांनी घरी थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. घरी असलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करुन दूरदर्शनने ही पावले उचलली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.