ETV Bharat / sitara

हत्येचे गूढ रहस्य असलेला परिणीतीच्या 'गर्ल ऑन द ट्रेन'चा ट्रेलर रिलीज - रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘द गर्ल ऑन द ट्रेन’

परिणीती चोप्रा अभिनीत ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या आगामी थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर आता बाहेर आला आहे. २६ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार्‍या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे.

The Girl on The Train trailer
'गर्ल ऑन द ट्रेन'चा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Feb 3, 2021, 7:26 PM IST

मुंबई - एक आकर्षक टिझरनंतर परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता ट्रेलर रिलीज केला आहे. ही एका मर्डर मिस्ट्रीची गुढ कथा असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येते.

द गर्ल ऑन द ट्रेनचा ट्रेलर नेटफ्लिक्सच्या अधिकृत मीडिया पेजवर रेलिज करण्यात आलाय. हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होणार आहे. ट्रेलरमध्ये घटस्फोटित मीरा (परिणीती) एका व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम घडवते याची झलक पाहायला मिळते.

रिभू दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट २०१६ मध्ये आलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यात अभिनेता एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत आहे. हेच शीर्षक असलेल्या पॉला हॉकिन्सच्या २०१५ प्रकाशित झालेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यूकेमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात आदिती राव हैदरी, कीर्ति कुल्हारी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. गर्ल ऑन द ट्रेन ची निर्मिती रिलायन्स एंटरटेन्मेंटने केली आहे.

हेही वाचा - ''ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत'', रिहानाला उत्तर देताना बरळली कंगना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.