ETV Bharat / sitara

सुभाष घईंनी 'त्या' चित्रपटाची कथा चोरलेली नाही; गुन्हा रद्द

औरंगाबाद शहरातील लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसेन सिद्दीकी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने सुभाष घईंविरोधीतील हा गुन्हा रद्द केला आहे.

सुभाष घईंनी 'त्या' चित्रपटाची कथा चोरलेली नाही; गुन्हा रद्द
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:41 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर चित्रपटाची कथा चोरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. औरंगाबाद शहरातील लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसेन सिद्दीकी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने सुभाष घईंविरोधीतील हा गुन्हा रद्द केला आहे.

औरंगाबाद शहरातील लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसेन सिद्दीकी यांनी १९८३ साली 'श्रीमती' या नावाने कथा लिहिली होती. त्यांनी ही कथा दिगदर्शक प्रकाश मेहरा यांना देखील सांगितली होती. मात्र २० जुलै २००९ मध्ये 'पेइंग गेस्ट' नावाचा चित्रपटात आपल्याच कथेचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप मुश्ताक यांनी केला होता.

त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश दिले होते. ११ एप्रिल २०१८ रोजी यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान सुभाष घई यांच्या वकिलाने काही बाबी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्या. मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी आपले कथानक फिल्म रायटर अशोसीएशनकडे नोंदणी केली असली तरी 'कॉपी राईट अॅक्ट' खाली कुठलीही नोंद केलेली नाही. इतकेच नाही तर, संबंधित कथा प्रकाश मेहता यांनी फिल्म रायटर असोसिएशन कडून कराराद्वारे विकत घेतली आहे, असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयानी सुभाष घई यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द केला.

Intro:कथा चोरून चित्रपट तयार केल्याच्या आरोपात न्यायालयामार्फत प्रोसेस इश्यू झालेले चित्रपट निर्माते - दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात दाखल करून घेतलेला गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केला.

Body:औरंगाबाद शहरातील लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसेन सिद्दीकी यांनी 1983 साली "श्रीमती" या नावाने कथा लिहिली असून ही कथा सुभाष घई यांच्या चित्रपटात वापरल्याचा आरोप करण्यात आला होता.

Conclusion:मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी लिहिलेल्या त्या कथेचे फिल्म रायटर असोसिएशन मध्ये नोंदणी केली होती. शिवाय दिगदर्शक प्रकाश मेहरा यांना देखील कथा सांगितली होती. मात्र 20 जुलै 2009 मध्ये पेइंग गेस्ट नावाचा चित्रपट मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी पहिला, आणि ही कथा आपली कथा असल्याचं त्यांना जाणवलं. त्यानुसार सुभाष घई यांनी आपली कथा चोरल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश दिले. 11 एप्रिल 2018 रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान सुभाष घई यांच्या वकिलाने काही बाबी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्या. मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दीकी यांनी आपलं कथानक फिल्म रायटर अशोसीएशन कडे नोंदणी केली असली कॉपी राईट ऍक्टखाली कुठलीही नोंद केलेली नाही. इतकंच नाही संबंधित कथा प्रकाश मेहता यांनी फिल्म रायटर असोसिएशन कडून काराराद्वारे विकत घेतली आहे. असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयानी सुभाष घई यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द केला.
(या बातमीत सुभाष घई यांचा स्टॉक फोटो वापरावा, न्यायालयाची फाईल व्हाट्स अँप वर टाकली आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.