बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचा धुमाकूळ चालूच असतो. बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवलेल्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे सदस्यांमध्ये बरेच वादविवाद, ओढाओढी झाली. संचालिका मीनल आणि मीरामध्ये देखील बरेच वाद झाले. हे भांडण आणि धक्काबुक्की वेगळ्याच टोकाला गेले. कार्यादरम्यानचे राडे संपायचे नावचं घेत नाहीये. याच टास्कमुळे मीनल आणि विशालमध्ये देखील भांडण झालं. Fair आणि Unfair यावरून दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली. दिवसेंदिवस घरातील समीकरण, नाती बदलताना दिसत आहेत. मीनल याचबाबतीत बोलायला आणि तिचा मुद्दा मांडायला विशालकडे गेली असता विशालचा कुठेतरी मीनलच्या सांगण्यावर अजिबात विश्वास नाहीये असे दिसून आले.
बिग बॉस मराठीच्या घरातील लाडका सदस्य म्हणजे संतोष चौधरी (दादूस). प्रत्येक सदस्याच्या ते तितकेच जवळचे आहेत. कालपासून सुरू झालेल्या साप्ताहिक कार्याच्या दरम्यान दादूस ज्याप्रकारे खेळले त्याचं कौतुक स्नेहा, जय, उत्कर्ष आणि नीथा करताना दिसले. जय म्हणाला, मी दुसर्या फेरीला दादूस यांना आणलं...स्नेहा म्हणाली दादूसला तुम्ही मुद्दाम पाठवलना?....जय म्हणाला त्यांनी स्वत:हून सांगितलं, दादूसचं म्हणाले मी जाणार... स्नेहा म्हणाली त्यांना आम्ही धक्का मारू शकतो का? मी दादूस यांना पकडल पण होतं, आणि पाडू पण शकले असते पण...
![बिग बॉस मराठीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये धक्काबुक्की](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-bigg-boss-marathi3-captaincy-task-deals-mhc10001_04112021211419_0411f_1636040659_592.png)
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी मिळणे हे अत्यंत महत्वाचे असते. कारण कॅप्टन्सीसोबत सदस्यांना मिळते एका आठवड्याची इम्म्युनिटी जी अत्यंत महत्वाची असते आणि आता हे सदस्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो वा आठवड्याच्या सुरुवातीला असो डील करायला तयार होत आहेत. तसंच झालं मीनलच्या बाबतीत तिने टास्क सुरू होण्याआधीच मीराला डीलसाठी विचारले. आणि याबाबतीच विशाल, गायत्री आणि मीरा मध्ये आज चर्चा झाली.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा प्रसारित होतो दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर.
हेही वाचा - टीव्ही मालिकांमध्ये पाहायला मिळणार दिवाळीचा जल्लोष!