मुंबई - भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचे नाव सुवर्णाक्षरात लिहून ठेवले जाईल. त्या चित्रपटातील प्रमुख पात्रांबरोबरच छोटी छोटी पात्रेही खूप फेमस झाली. प्रमुख पात्रांमध्ये जय (अमिताभ बच्चन), वीरू (धर्मेंद्र), ठाकूर (संजीव कुमार), बसंती (हेमा मालिनी), राधा (जया बच्चन) ही पात्रे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. यातील प्रसिध्द पात्र म्हणजे गब्बर सिंग. गब्बर सिंग सारखा व्हिलन हिंदी चित्रपटामध्ये पुन्हा होणे नाही असे बोलले जाते. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन उत्सुक होता. परंतु दिग्दर्शकाने लेखक सलीम नवख्या अमजद खानला संधी दिली होती. परंतु त्या भूमिकेसाठी त्याकाळी खलनायकी कलाकारांना ती ऑफर झाली होती. ज्यात ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा हेही होते. परंतु, त्यावेळी त्यांनी गब्बर सिंग ची भूमिका नाकारली होती. का ते त्यांनी इंडियन आयडॉल च्या मंचावरून सांगितले.
शत्रुघ्न सिन्हांनी नाकारला होता ‘शोले’; वाचा, काय सांगितले कारण?
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सिझन १२ मध्ये या वीकएंडला बॉलीवूड स्टार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा हे या मंचाला भेट देणार आहेत. आणि त्यामुळेच आगामी भाग हा ‘शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा’ विशेष भाग असणार आहे. सर्व स्पर्धक हिमेश रेशमिया, सोनू कक्कड आणि अन्नू मलिक या परीक्षकांसमोर खुद्ध शत्रुघ्न सिन्हाच्या उपस्थितीत त्यांची गाजलेली गाणी सादर करताना दिसतील.