ETV Bharat / sitara

'बॅन लिपस्टिक' म्हणणाऱ्या तेजस्विनी पंडीतने केला कारणाचा खुलासा - Tejaswini Pandit's Instagram video goes viral

सोशल मीडियावर गेले काही दिवस 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच ट्रेडिंगमध्ये आहे. हा हॅशटॅग वापरत मराठीमधील अभिनेत्री प्राजक्‍ता माळी, सोनाली खरे अशा काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तेजस्विनी पंडीतने लिपस्टिक लावण्याला विरोध केला होता. त्यानंतर #BanLipstick हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत होता. आता याचा खुलासा झाला आहे.

तेजस्विनी पंडीत
तेजस्विनी पंडीत
author img

By

Published : Dec 8, 2021, 7:40 PM IST

मराठी अभिनेत्री 'तेजस्विनी पंडित' हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक' असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला होता. तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री प्राजक्‍ता माळी, सोनाली खरे यांनी सुद्धा तिला पाठिंबा देत अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करत 'बॅन लिपस्टिक' असं म्हंटलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमुळे बॉलिवूड कलाकारांसोबत चाहते देखील गोंधळात पडले होते. मात्र, आता खुलासा झाला असून तेजस्विनी लवकरच एका वेबसिरीजमधून चाहत्यांच्या भेटीस येत असल्याचं समजतंय. स्वतः तेजस्विनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

'सध्या चर्चेत असलेलं नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. 'अनुराधा' येतेय…' असं तेजस्विनीने म्हंटलं आहे. ही वेब सिरीज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - Farah's Vi Kat Wedding Video : फराह खानने मोडला विकॅट लग्नाचा नियम, शेअर केला करणसोबतचा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.