ETV Bharat / sitara

सुष्मिता सेनने शेअर केले आर्या 2 चे आक्रमक मोशन पोस्टर - Sushmita Sen's aggressive look

अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen)तिच्या इंस्टाग्रामवर 'आर्या 2' चे मोशन पोस्टर (Motion poster of 'Arya 2') शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुष्मिता किलर स्टाईलमध्ये दिसत आहे.

आर्या 2 चे आक्रमक मोशन पोस्टर
आर्या 2 चे आक्रमक मोशन पोस्टर
author img

By

Published : Nov 24, 2021, 5:26 PM IST

मुंबई - सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) प्रसिद्ध वेब सिरिज 'आर्या'चा दुसरा सीझन रिलीज (second season release of the web series Arya) होणार आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर आर्या-२ चा मोशन पोस्टर (Motion poster of 'Arya 2') व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता बंदूक घेऊन हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी सुष्मिताने पांढरी साडी नेसली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आर्या-2चा ट्रेलर येत आहे. शेरणी येत आहे, सर्वांना सांगा आणि शेअर करा, Hotstar Specials Arya Season 2 चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे."

दिग्दर्शक राम माधवानी यांनी 'आर्या 2' या वेब सिरीजमध्ये सुष्मिता सेनच्या पात्राच्या काही शेड्स तयार केल्या आहेत. या वेबसिरीजमधून दिग्दर्शक राम माधवानी यांचेही डिजिटल डेब्यू आहे. त्यांचा 'धमाका' हा एक चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

सुष्मिता सेनसोबत आर्यामध्ये चंद्रचूर सिंग, सिकंदर खेर, विकास कुमार, जयंत कृपलानी यांनी सहकलाकार म्हणून काम केले होते. पाच वर्षांनंतर सुष्मिता आर्यासोबत कमबॅक करत आहे. या शोमध्ये एक चांगली आई म्हणून सुष्मिताचा प्रवास आणि तिचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मोशन व्हिडीओ पाहून असे वाटते की सुष्मिता 'आर्या 2' मध्ये तिच्या पतीचा बदला घेणार आहे.

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारात भारताच्या पदरी निराशा

'डिस्ने + हॉटस्टार' या ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवरील 'आर्या' या मालिकेला सर्वोत्कृष्ट ड्रामच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते. मात्र, या श्रेणीत इस्रायलच्या 'तेहरान' या मालिकेला पुरस्कार देण्यात आला.

सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. तिने 1996 मध्ये आलेल्या दस्तक चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बीवी नंबर 1, डू नॉट डिस्टर्ब, मैं हूं ना, मैने प्यार क्यूं किया आणि तुमको ना भूल पायेंगे आणि नो प्रॉब्लेम यासारख्या चित्रपटांतील भूमिकामुळे ती चर्चेत राहिली होती.

हेही वाचा - जर्सी ट्रेलर लॉन्च: शाहीद म्हणतो की वडील पंकज कपूरसोबत काम करताना भीती वाटते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.