कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन तीन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या सिझनचा दुसरा आठवडा सुरू झाला असून तो सुरू होताच बिग बॉस ने घरातील सदस्यांवर “हल्लाबोल” हे कार्य सोपावले. हा टास्क आजच्या भागामध्ये देखील बघायला मिळणार असून हे दोघे किती वेळ बाईकवर बसू शकतात हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. टास्क जिंकण्यासाठी टीममधील सदस्य अनेक फंडे वापरताना दिसणार आहेत. ते कोणते हे पुढील भागामध्ये दिसेल.
‘हल्लाबोल’ कार्यात दोन टीम्स आहेत. काल मोटर बाईकवर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहेत तर आम्ही खेळताना दिसलो पाहिजे, कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाहीये. बर्याच चर्चेनंतर सोनाली आणि सुरेखा ताईंसोबत टास्कला सुरुवात झाली. त्यानंतर मोटर बाईकवर बसायला आले विकास आणि विशाल.
हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना ‘टास्क के लिये कुछ भी’. टास्कच्या दरम्यान, आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे. त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसणार आहे “जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? आता स्नेहाच्या या टोमण्यावर आविष्कार काय उत्तरं देणार आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वाद विवाद होणार हे कळेल पुढील भागामध्ये.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - नो टाईम टू डाय प्रीमियर : जेम्स बाँडने लक्ष वेधले, रेड कार्पेटवर अवतरले राजघराणे