मुंबई - नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे घर घेण्याचे स्वप्न असते. अशीच स्वप्ने घेऊन या मायानगरीत हजारो कलाकारही येतात. चमचमत्या चंदेरी दुनियेत नाव लौकिक मिळवल्यानंतर वेध लागते ते इथे घर घेण्याचे. असेच स्वप्न घेऊन सातासमुद्रापार आली होती एक ललना...सनी लिओन. सनीने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती पती डॅनियल वेबर आणि तीन मुलांसह स्वतःच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मूळ भारत निवासी असलेली सनी लिओन ही कॅनडा, अमेरिकेची नागरिक आहे. तिची जगभर ओळख झाली ती पॉर्नस्टार म्हणून. काही वर्षांपूर्वी तिची एन्ट्री बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून झाली आणि हळूहळू तिने भारतात पाय रोवायला सुरुवात केली. आपली पॉर्नस्टार ही ओळख पुसण्यात ती यशस्वी झाली आणि आता ती स्वतःला बॉलिवूड स्टार म्हणवून घेते.
बॉलिवूड स्टार म्हटले की मुंबईत घर असणे आवश्यक आहे. आजवर ती पती डॅनियल वेबरसोबत मुंबईत भाड्याच्या घरात राहात होती. दरम्यान तिने 2017 मध्ये लातूर येथील अनाथाश्रमातून एका मुलीला दत्तक घेतले. तिला निशा कौर वेबर असे नावही तिने दिले. त्यानंतर 2018 मध्ये सनी लिओनला सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळी मुले झाली. मुलाचे नाव आहे अशेर सिंग वेबर आणि मुलीचे नाव आहे नोहा सिंग वेबर. आता ती पती आणि तीन मुलांसह आपल्या हक्काच्या मुंबईतील घरात प्रवेश करती झाली आहे.
सनीने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत पती डॅनियल तिला उचलून घेऊन गृहप्रवेशासाठी सज्ज दिसतो. दुसऱ्या फोटोत ती पतीच्या बाहुपाशात असून तीन्ही मुलांसह गृहप्रवेश करताना दिसत आहेत. निरागस निशा, अशेर आणि नोहा आपल्या मात्या पित्यांकडे प्रेमाने पाहतानाचा हा सुंदर फोटो आहे. तर तिसऱ्या फोटोत हे जोडपे आपल्या मुलांसोबत घरात जमीनीवर बसलेले दिसत असून खाण्याचा आनंद घेत आहेत.
एकंदरीत सनी लिओनचे मुंबईकर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अंधेरी वेस्टमधील एका आलिशान फ्लॅटमध्ये तिने स्वप्नातील घर सजवले आहे. तिच्या या गृहप्रवेशाबद्दल तिचे असंख्य चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा - FAT ते FIT झाले 'हे' पाच बॉलीवुड स्टार्स, एकाने लावली होती जीवाची बाजी