ETV Bharat / sitara

‘देवमाणूस’ मालिकेतील आजी खरंच आंधळी आहे का? तिची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का? - झी मराठीवरील 'देवमाणूस' मालिका

‘देवमाणूस’ या मालिकेत सुरुवातीपासून सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे सरू आजींना नक्की दिसतं कि नाही? आता आगामी भागात अजितकुमार सरू आजींची साक्ष घेणार आहे आणि यात तो सिद्ध करणार आहे कि सरू आजी अंध नसून त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतं. सरू आजींना दिसतं हे सिद्ध झाल्यावर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

storyline-in-the-series-devmanus-
‘देवमाणूस’
author img

By

Published : Jun 26, 2021, 4:53 PM IST

झी मराठीवरील 'देवमाणूस' मालिकेत सध्या डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. सत्य घटनेवरील आधारित या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आता कोर्टातील केसनंतर अजितकुमार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे.

या मालिकेत सुरुवातीपासून सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे सरू आजींना नक्की दिसतं कि नाही? आता आगामी भागात अजितकुमार सरू आजींची साक्ष घेणार आहे आणि यात तो सिद्ध करणार आहे कि सरू आजी अंध नसून त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतं. सरू आजींना दिसतं हे सिद्ध झाल्यावर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकला नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत.

तसंच आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि ऍडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

‘देवमाणूस’ ही रहस्यमय मालिका सोमवार ते शनिवार, झी मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - 'माझा होशील ना' मध्ये दिसणार पिस्तूल आणि गोळीबार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.