ETV Bharat / sitara

स्टार प्रवाहच्या कलाकारांचा दाक्षिणात्य नृत्य-तडका! - स्टार प्रवाह मालिका न्यूज

सुप्रसिद्ध तमिळ सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत नवे चॅलेंज स्वीकारले आणि त्याची सोशल मीडियावर धूम उडाली. सोशल मीडियावरचे कोणतंही चॅलेंज असले तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला.

दक्षिणात्य नृत्य
दक्षिणात्य नृत्य
author img

By

Published : Mar 14, 2021, 7:21 PM IST

मुंबई- संगीत आणि नृत्य हे मनोरंजनसृष्टीचा अविभाज्य भाग आहेत. बरेचजण, ज्यात कलाकारांचाही समावेश आहे. भाषा समजत नाही अशा गाण्यांवर पण थिरकताना दिसतात. स्टार प्रवाह कलाकारही याला अपवाद नाहीत. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. तसेच, आता समाज माध्यमांवर निरनिराळी चॅलेंजेस दिली जाता आहेत आणि त्याच अनुषंगाने नुकत्याच स्टार प्रवाह विविध मालिकांमधील अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य तडका देत साऊथच्या गाण्यावर ताल धरला आणि थिरकताना दिसले.

दक्षिणात्य नृत्य
दक्षिणात्य नृत्य

सहकुटुंब सहपरिवार मालिकेची लेडी गँग चर्चेत
सुप्रसिद्ध तमिळ सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत नवे चॅलेंज स्वीकारले आणि त्याची सोशल मीडियावर धूम उडाली. सोशल मिडियावरचे कोणतंही चॅलेंज असले तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला. यासाठीसुद्धा स्टार प्रवाहवरील मालिकांमधील कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेची ही लेडी गँग सध्या या गाण्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांचं पडद्यावर पटत नसले तरी त्यांनी यात सहभाग घेतला आणि पडद्यामागची या दोघांची केमिस्ट्री खरोखर वाखाणण्याजोगी आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मिडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखील सरु, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला.

नृत्याचा ठेका धरला
‘मुलगी झाली हो’ मालिकेतील माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर देखिल यात मागे नव्हती. व्हिडिओमधील तिचा सोज्वळ अंदाज भाव खाऊन गेला. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू उत्त्तम नृत्यांगना आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत नृत्याचा ठेका धरला. या नव्या चॅलेंजमध्ये सहभागी होत तिने धमाल केली. मालिकांप्रमाणेच कलाकारांची पडद्यामागची धमाल प्रेक्षकांना आवडत आहे.या सर्व व्हिडिओंना स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर लाखांमध्ये व्हूज आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.