ETV Bharat / sitara

..म्हणून रजनीकन्या सौंदर्याने डिलीट केला स्वीमिंग पूलमधील व्हायरल फोटो

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्याने यावर्षी फेब्रुवारीत दुसरे लग्न केले होते. सौंदर्याला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. त्याच्यासोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर टीकेची झोड काहींनी उठवली आहे.

सौंदर्य रजनीकांत
author img

By

Published : Jul 1, 2019, 8:43 PM IST

चेन्नई - यावर्षीच्या सुरुवातीला रजनीकांतची मुलगी सौंदर्याने बिझनेसमन विशगन वनांगामुडी याच्यासोबत दुसरे लग्न केले. यापूर्वी तिने अश्विन राजकुमार याच्यासोबत लग्न केले होते. त्याच्यापासून तिला वेद नावाचा मुलगा आहे. ती नेहमी आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. अलिकडेच तिने काही फोटो शेअर केले होते. यात ती वेदसोबत स्वीमिंगपूलमध्ये दिसत होती. तिचा हा फोटो काही लोकांना आवडला नाही.

Soundrya Rajnikant
सौंदर्य रजनीकांत

सौंदर्याने आपला फोटो शेअर केल्यानंतर तिला अतिशय वाईट कॉमेंट्स यायला सुरू झाल्या. चेन्नईत पाणी समस्या तीव्र असताना ही स्वीमिंगपूलमध्ये एन्जॉय करते अशा बोचऱ्या कॉमेंट्सचा पाऊस पडला.

सौंदर्याने शेअर केलेल्या मुलासोबतच्या फोटोला कॅप्शनमध्ये म्हटले होते, "याला लहानपणीच शिकवा..आणि हे स्वतःच चमकायला शिकतील. स्वीमिंग एक जरुरूची गोष्ट आहे."

  • Removed the pictures shared in good spirit from my #TravelDiaries considering the sensitivity around the current #WaterScarcity we are facing 🙏🏻. The throwback pics were to emphasise the importance for physical activities for children from a young age only 🙂🙏🏻 #LetsSaveWater

    — soundarya rajnikanth (@soundaryaarajni) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकांचे विचित्र कॉमेंट्स यायला सुरुवात झाल्यानंतर सौंदर्याने ही पोस्ट डिलीट केली आहे. या दिवसात आपण पाणी समस्येला सामोरे जात आहोत. याकडे संवेदनशीलपणे पाहात मी माझी पोस्ट ट्रॅव्हल डायरीवरुन डिलीट करीत असल्याचे तिने म्हटलंय. तो जुना फोटो फक्त यासाठी शेअर केला होता की, पोहोण्याचे महत्त्व कळावे. पाणी वाचवा, असेही तिने पुढे म्हटलंय.

सौंदर्याने फोटो डिलीट केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी तिच्या संवेदनशीलतेचे कौतुक केलंय, तर काहीजणांनी तिला काय म्हणायचे होते हे नीट समजून न घेता तिला ट्रोल करण्यात आले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.