ETV Bharat / sitara

'वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘आई बाबा’ गाणे रिलीज!

author img

By

Published : Apr 3, 2021, 5:35 PM IST

'वेल डन बेबी' या आगामी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. ‘आई बाबा’ हे गाणे संगीतकार द्वयी रोहन-रोहन पैकी रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. या गाण्याचे चित्रीकरण अतिशय सुंदर झाले आहे.

well-done-baby
'वेल डन बेबी’

जेव्हापासून 'वेल डन बेबी' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची घोषणा झाल्यापासून तो भरपूर चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाल्यावर तो कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात पाहिला गेला. चित्रपटाचा ‘लूक’ अतिशय फ्रेश असून आधुनिक एकल कुटुंबातील उद्भवणाऱ्या समस्यांना नाजूकपणे हाताळण्यात दिग्दर्शिका प्रियांका तन्वर यशस्वी झाल्यागत वाटते. खासकरून तिने चित्रपटातील गाण्याच्या चित्रणात फारच हळूरवरपण जाणवते. नुकताच या चित्रपटातील गाण्यांचा अल्बम अनावरीत केला गेला आणि या कौटुंबिक चित्रपटाचा म्युझिक अल्बम रसिकांचे मन जिंकतो आहे. या साऊंड ट्रॅकमधील ‘आई-बाबा’ हे गाणं अतिशय सुंदर बनले असून ते जगात प्रेम आणि नवीन आयुष्य साजरे करते.

well-done-baby
‘आई बाबा’ गाणे रिलीज
‘आई बाबा’ हे गाणे संगीतकार द्वयी रोहन-रोहन पैकी रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. संगीत संयोजनात रोहन गोखले याने देखील आपली भूमिका चोख निभावली असून उर्वरीत गाण्यांना अर्पिता चक्रवर्ती या गायिकेचा स्वरसाज लाभला आहे.‘आई बाबा’ या प्रदर्शित झालेल्या पहिल्या गाण्याला सिनेमात ओटी भरण्याचा पार्श्वभूमी लाभली आहे. सिनेमातील दाम्पत्याला बाळाची चाहूल लागली असून त्यांच्या जीवनातील गोड भाग या गाण्यातून समोर येतो. प्रत्येक गाणे हे सर्जनशील लेखणीतून साकारले आहे. त्याचे चित्रीकरण देखील उत्तम झाले आहे असेही अभिनेता-निर्माता पुष्कर जोग चे म्हणणे आहे.
well-done-baby
‘आई बाबा’ गाणे रिलीज
या सुमधुर अल्बमविषयी बोलताना तो पुढे म्हणाला की, “संगीत हा आमच्या वेल डन बेबी फिल्म मधील गाणी प्रसंगांना साजेशी आहेत, तो एक चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गाण्याला खोल अर्थ आहे. रोहन-रोहन ही मराठी सिने क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावंत जोडी असून त्यांनी वेल डन बेबी’चे संगीत तयार केले आहे. नक्कीच गाण्यांमुळे फिल्मची उंची वाढेल.”हा सिनेमा प्रियांका तन्वर हिने दिग्दर्शित केला असून मर्मबंध गव्हाणे लेखक आहेत. ‘वेल डन बेबी’मध्ये पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद पंडित, मोहन नाडर आणि पुष्कर जोग हे सिनेमाचे निर्माते आहेत तर व्हिडीओ पॅलेस सादरकर्ते आहेत. भारतात प्राईम मेंबर्सकरिता ९ एप्रिल २०२१ पासून सिनेमा स्ट्रीम होईल.

हेही वाचा - विकी कौशलने केले सॅम माणेकशॉ यांचे जयंती निमित्य स्मरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.