गणपती बाप्पा बुद्धीची, विद्येचं , बुद्धीचं आणि कलेचं दैवत आहे. बाप्पाची नानाविध रूपं आहेत. नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येक घरात, राज्यात नव्हे तर जगात जेथे कुठेही बाप्पाचे भक्त आहेत तेथे सुरु झाली आहे. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा म्हणजेच चतुर्थीचा सण अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो, आणि म्हणूनच मुंबईतले सगळे चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
संगीत क्षेत्रासाठी ही गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणी असते. संगीत क्षेत्रात आपले वैविध्य आणि वेगळंपण नेहमीच जपणाऱ्या सागरिका म्युझिकने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या वर्षी सागरिका म्युझिकने रसिकांसाठी कोकणचा गणपती या गाण्याची निर्मिती केली आह. ‘कोकणचा गणपती’ हे गाणं ऑडिओ आणि विडिओ या रूपात सागरिका आपल्यासाठी घेऊन आले आहेत. चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायलंसुद्धा आहे. चिंतामणी सोबत या गाण्यात महाराष्ट्रातील ३ सुप्रसिद्ध गायक वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी आपला स्वरसाज या गाण्याला दिला आहे. रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.
सागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा अगदी कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण करून देतो. कोकणातली घरगुती गणपतीची सजावट इत्यादी पाहून आपणही अगदी कोकणात असल्याचं वाटतं. या गाण्याचा ऑडिओ ६ सप्टेंबरपासून सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर ऐकायला मिळेल.
चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ ७ सप्टेंबरला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेल वर पाहता येईल.
हेही वाचा - सलमान खानला दिलासा, 'सेलमन भोई' गेम हटवण्याचा कोर्टाने दिला आदेश