ETV Bharat / sitara

वाढदिवसानिमित्त सोनाली कुलकर्णीचा अनोखा उपक्रम, पीपीई किटचं करणार वाटप - sonali kulkarni birthday special

येत्या 18 मे रोजी सोनालीचा वाढदिवस आहे. सोनालीच्या चाहता वर्गाचे नाव आहे ' 'सोनालिअन्स '. हे सर्व सोनालिअन्स आणि अभिनेत्री यांनी या लॉकडाऊनमध्ये वाढदिवसानिमित्त एक अनोखं गिफ्ट यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणेला देण्याचे ठरवले आहे.

sonali kulkarni will distribute ppe kit on her birthday
सोनाली कुलकर्णीनं जपली सामाजिक बांधिलकी
author img

By

Published : May 17, 2020, 9:56 AM IST

मुंबई - अभिनय क्षेत्रात एखादा कलाकार मोठा होत जातो त्याच्या मेहनतीमुळे, विविध भूमिका तो जगतो आणि प्रेक्षकांनासुद्धा जगायला शिकवतो. सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीचे नाव नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहत आले आहे. 'नटरंग'मधील लावणी नर्तिका असो किंवा 'मितवा', 'हंपी' सारख्या मॉडर्न व्यक्तिरेखा किंवा 'हिरकणी' सारखं एखादं उत्कृष्ट पात्रं . सोनालीने सादर केलेली प्रत्येक भूमिका तिनं जिवंत केली आहे आणि त्यामुळेच तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

येत्या 18 मे रोजी सोनालीचा वाढदिवस आहे. सोनालीच्या चाहता वर्गाचे नाव आहे ' 'सोनालिअन्स '. हे सर्व सोनालिअन्स आणि अभिनेत्री यांनी या लॉकडाऊनमध्ये वाढदिवसानिमित्त एक अनोखं गिफ्ट यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणेला देण्याचे ठरवले आहे. अभिनेत्री सोनाली तिच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असते . जेव्हा तिच्या चाहत्यांनी सोनालीला आपण लॉकडाऊनमधील वाढदिवस कसा साजरा करणार त्याबद्दल विचारले तेव्हा सोनालीने एक उत्कृष्ट कल्पना मांडली.

ही कल्पना अशी होती, की सर्वांनी सोनालीला गिफ्ट म्हणून वस्तू देण्याऐवजी पैसे जमवायचे . जेवढे पैसे जमतील तेवढेच आणखी पैसे सोनाली स्वतःच्या अकाऊंटमधून देऊन भर करेल. यानंतर जमलेल्या सर्व पैशांचे एका हॉस्पिटल स्टाफला लागणारे पीपीई किट सोनालीच्या वाढदिवसानिमित्त दिले जाईल. सर्वांनाच सोनालीची ही कल्पना आवडली आणि सर्वांनी सढळ हाताने यासाठी पैसे दिले .

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंगची टीम, धुराळा चित्रपटाची टीम , हिरकणीची टीम , सोनालीचे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मित्र मंडळी , कुटुंबातील अनेकजण आणि सोनालिअन्स या सर्वांनी मिळून नेहमीप्रमाणे गिफ्ट न देता पैसे जमवले. सोनालीने त्यात तेवढ्याच पैशांची भर घालत या किट्सची खरेदी केली आणि तिच्या कल्पनेला खरे स्वरूप आले.

आता १८ मे रोजी ही उपयुक्त भेट यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे यांना दिली जाईल. सोनालीला यावर विचारले असता तिने सांगितले, 'या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे, ते मी करायचा प्रयत्न करत आहे . जिथे पैशांची मदत करण्याची गरज होती तीसुद्धा मी वेळोवेळी केली आहे. वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि गिफ्ट सुद्धा, मात्र यावेळी मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे. मी समाधानी आहे की माझ्या हक्काच्या मंडळींनी मला यासाठी पूर्णपणे साथ दिली आणि यावर्षीचा माझा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.